Home नांदेड नगर पंचायत च्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत माहूर न्यायालयात वृक्षारोपण.

नगर पंचायत च्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत माहूर न्यायालयात वृक्षारोपण.

276

मजहर शेख, 

नांदेड/माहूर, दि : ६ :- माहूर न्यायालयात न्यायाधीश मा.श्री पवन तापडिया साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या निर्देशानुसार नगर पंचायत माहूर अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत माहूर न्यायालयात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वृक्षारोपण कार्यक्रमात वृक्षारोपण करून न्यायमूर्ती .श्री पवन तापडिया साहेब यांना माहूर नगरपंचायत च्या नगराध्यक्षा कु.शितलताई मेघराजजी जाधव, व उपनगराध्यक्षा सौ.अश्विनी आनंद पाटील तुपदाळे यांच्या हस्ते माझी वसुंधरा चे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती .श्री पवन तापडिया यांच्या सह माहूर न्यायालयातील सर्व सन्मानननिय वकील साहेब,चेतनजी राठोड, पंजाबरावजी पाटील गावंडे, श्यामजी पाटील गावंडे,अविनाशजी ढगे, उज्ज्वलजी पाटील भोपी, जगदीशजी पाटील आडकीने ,दिनेशजी येउतकर, विशालजी भवरे , दिलीपजी मेहता,सुभाषजीराठोड, संदीपजी कांबळे ,सुभाषजी कांबळे, छंदकजी वाठोरे,रविजी कोंडे, विशालजी चव्हाण,संदीपजी चांदेकर, कु. साईलीताई कपाटे, नितिनजी बनसोडे,पवनजी ठेपेकर, जंगोजी सिडाम, व माहूर न्यायालयातील सर्व सन्माननीय कर्मचारी बावणे साहेब,पवार साहेब,कदम,मा. थोरात, ठाकरे व यांच्या सह माहूर शहर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, व माझी वसुंधरा वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजक तथा नगरपंचायत चे कर्तव्यदक्ष अधिकार मा.श्री गंगाधरजी दळवी व माझी वसुंधरा वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होते.