यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असून काल मनसेच्या तक्रारीनंतर राळेगाव येथे एक धडक कार्यवाही करण्यात आली.या घटनेने जिल्ह्यात होत असलेल्या रेती तस्करीची पोलखोल केली असून जिल्ह्यातील इतर तालुक्यात चालणाऱ्या या गोरखधंद्यावर लगाम लावण्याची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली.
जिल्ह्यात चालणाऱ्या या अवैध रेती उपस्या विरोधात मनसेने अनेक तक्रारी केल्या पण तालुक्यातील भ्रष्ट अधिकारी आणि प्रशासनातील दलालामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडीत आहे.तसेच जे घाट सुरू झालेत त्यात ही मोठ्या प्रमाणात गोंधळ असून यावर प्रशासनच कोणतही नियंत्रण नाही.या ठिकाणी बोट आणि जेसिपी ने रेती काढण्याचे काम सुरू आहे.राळेगाव तालुक्यात मबसेचे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांनी भांडाफोड केल्यावर प्रशासनाने कार्यवाही चा आव आणला परंतु हे सर्व प्रकार सुरू आहेत याची कल्पना प्रशासनाला नसावी ही बाब संशयास्पद आहे.सर्व ठिकाणी हप्ते बांधून आणि पाकिटे पोहचवून हा सर्व प्रकार राजरोसपणे सुरू आहे.या सर्व प्रकरणात संबंधित पोलिस स्टेशन, महसुल यंत्रणा, सह सर्व मिलीभगत करून हा सर्व प्रकार राजरोसपणे चालतो.या प्रसंगी मनसेने प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी पाकीट पद्धतीने जवळपास २५० गाड्या ना मूक संमती देऊन महिना बांधून रात्रीच्या अंधारात या व्यवसायाला परवानगीच दिल्याची माहिती मनसेने या प्रसंगी दिली.याप्रसंगी राळेगाव प्रमाणे इतर तालुक्यात चालणाऱ्या रेतीच्या या गोरखधंद्यावर तात्काळ कार्यवाहीची मागणी करत ज्या तालुक्यात असे प्रकार घडतील त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे आणि जिल्ह्यात चालणाऱ्या रेती घाटांवर कडक कार्यवाहीची मागणी या प्रसंगी देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी चर्चे दरम्यान केली. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेची आणि तक्रारीची गंभीरता लक्षात घेत तात्काळ जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना पाचारण करत या विरोधात कडक कार्यवाही करण्याचा विश्वास मनसेला दिला.या प्रसंगी प्रामुख्याने देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे,अमितबदनोरे, विकास पवार, अभिजित नानवटकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.