प्रहार संघटने द्वारे खराब मार्गामुळे खराब झालेले वाहन दिले तहसिलदार यांना भेट.
इकबाल शेख
वर्घा – आर्वी तालुका येथे प्रहार संघटनेद्वारे आर्वी काैंडण्यपुर, तळेगाव व वर्धा मार्गाचे बांधकाम त्वरीत सुरु करन्यासाठी प्रहार संघटने द्वारे दुचाकीची शव य़ात्रा काडुन आर्वी तहसिल कार्यालयात ठिय्या आदोलन करन्यात आले.
शासनाने आर्वी ते काैंडण्यपुर महामार्गाच्या नुतनीकरना करीता सुमारे ६० कोटि रुपयाचा निधि मंजुर केला यांचे कत्राट वेलस्पुन रोड ईन्फ्रा प्रा. ली. अमरावती या कंपनिला दिला. या मार्गाचे भुमीपुजन आजी, माजी आमदार वर्धा जिल्याचे पालक मंत्री यांनी सुद्धा केले या मार्गाने प्रवास करनार्यांना आनंद झाला मात्र कुठे माशी शिंकली माहित नाहि.
भुमीपुजन होताच कत्राटदाराने बांधकामाचे सर्व साहित्य व यत्रना घेउन गेला व काम बंद केले या मागचे कारन समजु शकले नाहि.
या मार्गावर संत महानुजी महाराज यांचे देवस्थान आहे, तर विदर्भ कन्या रुख्मिनीचे माहेर घर असुन अमरावती सारख्या मोठ्या पाजारपेठाला जोडनारा हा मार्ग आहे. अनेक वर्षा पासुन हा मार्ग प्रतिक्षेत असल्यामुळे याची डागडुजी सुध्दा झाली नाहि परीनामी मार्गावर तिन-तीन फुटाचे खड्डे झाले.
वाहन चालकांना या मार्गाने प्रवास कर्तांना खड्ड्यान मधुन मार्ग शोधावा लागतो खड्डा चुकविन्याच्या नादात अनेक अपघात झालेले अाहे अनेकांच्या जिवांची हानि झालेली आहे हात पाय तुटून अनेकावर अपंग होन्याची पाळी आली आहे.
तालुक्यातील नागरीक त्रास्त झालेले असुन तालुक्यातील नागरीकांना या समस्येमधुन सोडविन्याकरीता कत्राटदाराला त्वरीत बांधकाम सुरू करायला लावुन दोन महिन्याच्या आत बांधकाम पुर्ण करन्याचे बंधन टाकावे.
असे आर्वी तहसिल मध्ये दुचाकीची शव यात्रा काडत ठिय्या आदोलन करुन प्रहार संघटनेने तहसिलदार यांना निवेदन दिले.
आंदोलनाच्या वेळी अरसलान खान, सैयद जुनेद, प्रशांत क्षीसरसगर, इकबाल शेख,राजेश आगरकर, समीर भाई, विक्रम भगत, कलीम शेख, शेख वाजिद,हरी कळसकर,महबूब भाई,संजय कुरील,अबरार खान,गौतम कुंभारे,नुरू खाँ,वसीम रज़ा,गुड्डू पठान,जुम्मा शाह,जीशान खान,सुरेन्द्र टेकाम,मो.नज़ीर आदि प्रहार चे कार्यकर्ता उपस्थित होते।