Home विदर्भ यवतमाळ शहरात चोरट्यांचा हैदोस, एसपी ऑफीसच्या बाजुने पोस्टल ग्राउंडमधून दुचाकी चोरली

यवतमाळ शहरात चोरट्यांचा हैदोस, एसपी ऑफीसच्या बाजुने पोस्टल ग्राउंडमधून दुचाकी चोरली

155

यवतमाळ –  यवतमाळ शहरात सतत होत असलेल्या दुचाकी चोरींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कामानिमित्त आपल्या दुचाकीने घरून बाहेर आलेला व्यक्ती त्याच दुचाकीने घरी परत जाणार की नाही याची आज तरी शास्वती राहिलेली नाही. यवतमाळ शहरातच गेल्या महिनाभरात 40 पेक्षा अधिक दुचाकी चोरी गेल्या आहेत. काही दुचाकी चोरीची तर नोंदच नाही. शहरातील पोस्टल ग्राउंडवर नागरिक सायंकाळच्या सुमारास फिरावयास येत असतात, याच संधीचा फायदा घेवून काही चोरटे युवक येथून दुचाकी लंपास करतात, शनिवार 13 फेब्रुवारीच्या सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास वाघापूर येथील निवासी सचिन कावरे यांची होंडा शाइन दुचाकी क्रमांक एमएच 29 डब्ल्यू 6007 चोरटयांनी चोरून नेली. हे चोरटे दुचाकी घेवून महादेव मंदिरच्या दिशेने सुसाट पळून गेले. सततच्या होत असलेल्या चोरीबाबत पोलीस प्रशासनास जिल्ह्याचे पालकमंत्री सुध्दा जाब विचारत नसल्याने नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. दुचाकी चोरटयांचा शोध घेण्याचे आह्वान यवतमाळ पोलीसांसमोर निर्माण झाले आहे.