गुन्हा दाखल तपास सुरू ,
अमीन शाह ,
अकोला ,
पातूर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयातून कोरोना प्रतीबंधक लसीच्या सात बाटल्या चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री उशीरा उघडकीस आला आहे . यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.पातुर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयात ५ फेब्रुवारीपासून कोविड १ ९ कोरोना लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली . ५ फेब्रुवारीपासून दररोज किती लस देण्यात आल्या याची नोंद घेऊन लस कोविड कक्षात सुरक्षित ठेवल्या जात होत्या . ११ फेब्रुवारी रोजी पर्यंत सर्व व्यवस्थित होते . परंतु १२ फेब्रुवारी रोजी ७ बाटल्या गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता . सदर प्रकार उघडकीस आल्याच्या चार दिवसानंतर मंगळवारी १६ फेब्रुवारी रोजीच्या रात्री चान्नी पोलिसात तक्रार देण्यात आली . कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध स्तरावर योजना राबवून कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारा मूळे सर्वत्र खळबळ उडाली असून या प्रकरणाची चर्चा केली जात आहे ,बाटल्या कोणी व का चोरल्या याचा तपास पोलीस विभाग करीत असून लवकरच करोना लसीच्या बाटल्या कोण चोरल्या हे समोर येणार आहे ,