ईकबाल शेख
वर्धा तळेगांव (शा.पं.) : -जोरात कडाडलेली वीज बाभळीच्या झाडावर पडुन झाड कोसळल्याने त्याच क्षणी रोडने दुचाकीने कामावर जाणार्यां दोघावर झाड कोसळल्याने दुचाकीसह दोघे त्याखाली दबुन गंभीर जखमी झाले. हि घटना आष्टी तालुक्यातील भारसवाडा खडकी दरम्यान मुंजेबा मंदीर नजीक आज सकाळी ११वाजताचे दरम्यान घडली. जखमीमध्ये मुरलीधर मुंदाने, रा. तळेगांव व पुरुषोत्तम बाळस्कर रा. ममदापुर असे दोघे. आहेत.
प्राप्त माहितीनुसार मुरलीधर मु्दाने यांचे अंतोरा येथे वेल्डींग चे दुकान आहे ते त्यांचा सहकारी पुरुषोत्तम बाळस्कर यांचे सह तळेगाव वरुन अंतोरा येथे दुकानात कामावर जात होते .दरम्यान विजेचा कडकडाट सुरु असताना जोरात कडाडलेली विज भारसवाडा खडकी दरम्यान मुंजेबा मंदीर नजीकच्या रोडच्या बाभळीच्या झाडावर पडली व ते झाड कोसळले त्याच क्षनी हे दोघे त्या झाडाखाली आले असता दुचाकीसह त्यामध्ये दबले त्यात मुरलीधर मुंदाने हे किरकोळ जखमी झाले असुन पुरुषोत्तम बाळस्कर यांचे दोन्हि पाय मोडल्याचे समजले. हि घटना खडकी येथील सुरेंद्र नागपुरे यांना दिसली त्यांनी लगेच गावात जावुन सहकार्यांना सोबत घेवुन झाडाखाली दबलेल्या जखमींना बाहेर काढुन उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे रवाना केले.