यवतमाळ – यवतमाळ पासुन पाच कि. मी. अंतर असलेल्या किन्ही येथील युवक प्रतिष्ठानच्या विक्रम पंडित भाजीपाले वय २१ वर्ष हा सैनिक म्हणुन भरती झाला होता कर्नाटक मधील बेळगाव येथे त्याचे प्रशिक्षण सुरू असता त्याचे छातीत अचानक दुखायला लागल्याने त्यावेळी त्याच्या कमांडरला हि बाब लक्षात येताच त्यांनी विक्रमवर लगेचच उपचार सुरू केले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
विक्रांत च्या मृत्युने किन्ही गावात दुःखाचे सावट निर्माण झाले आहे ,त्याचे वडील पंडित यांना एकुलता एकच मुलगा असतानाही देशाच्या रक्षणा करिता सुपूर्द केला या दुर्दैवी घटनेने विक्रांत यांच्या आई वडिलांवर जणु काही दुःखाचे पहाड कोसळले समस्त गाव विक्रांत च्या पार्थिवाची वाट पहात असुन गावातील सर्वांनी आपले कामे बाजुला सारुन विक्रांत च्या पार्थिवाच्या अंगदर्शनाची वाट पहात आहे .