Home जळगाव गौरखेडा येथील सरपंचपदी शबाना तडवी उप सरपंचपदी मंगला महाजन यांची वर्णी

गौरखेडा येथील सरपंचपदी शबाना तडवी उप सरपंचपदी मंगला महाजन यांची वर्णी

327

रावेर (शरीफ शेख ) तालुक्यातील गौरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शबाना रफीक तडवी यांची तर उपसरपंच पदी मंगलाबाई बाबुराव महाजन यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. काँग्रेसचे रावेर तालुका उपाध्यक्ष गफूर तडवी यांनी भाजपचे माजी समाज कल्याण सभापतींच्या पॅनलचा पराभव करून सात पैकी आपल्या पक्षाचे ६ सदस्य निवडून आणले होते.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतुल चौधरी यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक सुभाष धूले, तलाठी अजय महाजन यांनी सहाय्य केले. आमदार शिरीष चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गफूर तडवी, विनोद भालेराव, साहेबराव पाटील, पांडुरंग राजाराम महाजन आदी उपस्थित होते.