Home जळगाव मुक्ताईनगर तालुक्यातील उडान पुलाना महापुरुषांचे नाव देण्यात यावे….

मुक्ताईनगर तालुक्यातील उडान पुलाना महापुरुषांचे नाव देण्यात यावे….

276

मुक्ताईनगर येथील नागरिकांकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले…

रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील
मुक्ताईनगर शहरालगत राज्य महामार्ग क्रमांक 6 वर उडान पुलाचे काम प्रगतीत असून त्यात बोदवड चौफुली वर असलेला उडान पुलांना “छत्रपती शिवाजी महाराज उडान पुल असे नामकरण करण्यात यावे व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे फार्म हाऊस समोरील उडान पुलांना “ए.पी.जी अब्दुल कलाम उडान पुल” असे नामकरण करण्यात यावे व साखर कारखान्या जवळील उडान पुल ला “भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उडान पुल”असे नामकरण करण्यात यावे व कोथळी बायपास वर असलेला उडान पुल ला “सरदार वल्लभ भाई पटेल उडान पुल असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी चे निवेदन मा.तहसिलदार यांना सादर करताना जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीचे उपाध्यक्ष शेख हकीम शेख रशीद,शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान,मुख्तार खान,मजीद बागवान,शेख आमद शेख यासीन,शेख असगर शेख अकबर,मोहन कौतीक मेढे,बशीर शाह आमद शाह, मराठा सेवा संघा चे प्रदेश प्रचारक दिनेश कदम अदि समाज बांधव उपस्थित होते.