Home विदर्भ जिल्हापरिषदेच्या भोंगळ कारभाराचे पुरावे मनसेच्या वतीने पीआरसी ला सादर….

जिल्हापरिषदेच्या भोंगळ कारभाराचे पुरावे मनसेच्या वतीने पीआरसी ला सादर….

232

यवतमाळ – यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पीआरसी च्या समिती प्रमुख आ.रायमुलकर आणि आ. सौ.प्रतिभा धानोरकर व इतर समितीच्या आमदारांना मनसेच्या वतीने जिल्हापरिषदेच्या भोंगळ कारभाराचे पुरावे मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले.स्थानिक विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दिव्यांग शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात जिल्हापरिषदेच्या मुख्याधिकारी यांना वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही , या संबंधीचे माहितीच्या अधिकारात काढण्यात आलेले पुरावे समिती समोर ठेवण्यात आले. सोबतच नूर शिक्षण संस्थेच्या स्थानांतरण प्रकरणात विस्तार अधिकारी पप्पू भोयर यांनी दिलेला खोटा अहवाल पण समिती समोर ठेवण्यात आला, आणि या प्रकणात दोषींना पाठीशी घालणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी करण्यात आली.या प्रसंगी यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी शाळांच्या कारभारावर शिक्षण विभागाचे मौन का..? असा सवाल करत यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी शाळांवर शिक्षण विभाग कोणतीच कार्यवाही करण्याचे धाडस दाखवत नाही परिणामी खाजगी शाळा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना कवडीमोल किंमतही देत नाही. भोंबोरा सॅनेटायझर प्रकणात दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची पदवी रद्द करावी जेणे करून अशी घोडचूक कोणी करणार नाही.या सोबतच जिल्हापरिषदेच्या सर्व ग्रामसेवकांचा स्विय सहाय्यक म्हणून केलेल्या नियुक्त्या, पंचायत समिती यवतमाळ चा वृक्षलागवड घोटाळा, आणि कोरोना काळातील सर्व औषधी खरेदी आणि साहित्य खर्चाचा व्यवहार तपासावा अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली.या प्रसंगी बोलताना अनिल हमदापुरे यांनी रायमूलकर यांना पीआरसी च्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभा करणाऱ्या बहुचर्चित ऑडिओ क्लिप पण त्यांना ऐकविली आणि य सर्व प्रकरणावर आपण योग्य कार्यवाही करून सर्वसामान्य जनतेच्या मनातील पीआरसी विषयी पडलेल्या प्रश्नांना खोटे ठरवत या प्रश्नांची गंभीर दखल घेत कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येऊन दिव्यांग प्रश्नी आपण स्वतः या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आणि यावर आपण कडक कार्यवाही करण्याची सूचना करणार असल्याचे आणि इतर प्रकरणात पण सर्व समिती शी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला दिले आणि मनसेच्या या पाठपुराव्याने कौतुक करत जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेचे सर्व आमदारांनी स्वागत केले.या शिष्टमंडळात प्रामुख्याने देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, विकास पवार, अभिजित नानवटकर, सादिक शेख, सचिन एलगंधेवार सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.