Home सातारा पोलीस मित्र परिवार समन्वय समिती सातारा तर्फे नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांच्या व समाजात उत्कृष्ट...

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती सातारा तर्फे नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांच्या व समाजात उत्कृष्ट कार्य करण्याऱ्यांचा सन्मान..!

230

➡️  पोलिस मित्र परिवार समन्वय डॅा.संघपाल उमरे सर यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्र राज्यात पोलीस विभाग व सर्व सामान्य नागरिक यांच्या न्याय व हक्कसाठी सर्व पदधिकारी लढा देते आहे, समितीचे संस्थापक/ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी नुकतीच मा.भगतसिंहजी कोश्यारी राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांची मुंबई येथिल राजभवन मध्ये प्रत्यक्ष भेट घेऊन पोलीस विभागाच्या व पोलीस विभागात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या बाबतचे निवेदन दिले .

याचेच औचित्य साधुन दि.२२/२/२१ ला सातारा जिल्हातील फलटण येथे महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हाजी अस्लम सय्यद.पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माधुरी ताई गुजराती यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजी महाराज जयंती निमित्त सातारा जिल्हातील सर्व पोलीस मित्र परिवार समन्वय समिती पदधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे उदघाट्क हाजी अस्लम सय्यद पश्चिम महाराष्ट्र प्रमुख,कार्यक्रमाचे अध्यक्षा माधुरीताई गुजराती, पश्चिम महाराष्ट्र महिला प्रमुख,प्रमुख मार्गदर्शक गिताताई गायकवाड,नाशिक, प्रमुख पाहुणे सुभाषजी गायकवाड सातारा जिल्हा अध्यक्ष,प्रियंकाताई जाधव यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली प्रमुख पाहुण्यानी सर्व प्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन विनम्र अभिवादन केले. डॅा.शशीकांत जगदाळे.यांना व आशा स्वयंसेविकांचा व समाजात उत्कृष्ट कामगिरी करण्याऱ्यांचा ज्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोणा काळात सेवा दिल्या बद्दल व सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी समाजात उत्कृष्ट कामगिरी केली म्हणुन अश्या ३६ मान्यवरांचा सन्मान पत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.पोलीस मित्र परिवार समन्वय समिती च्या ध्येय व धोरणाविषयी,स्त्री-पुरुष समानता,धर्मनिरपेक्षता,व कोणतीही आक्रमकता न दाखवता किंवा कोणताही भावनिक आधार न घेता संविधानीक मार्गाचा अवलंब करुन कायद्याच्या चौकटित राहुन संयमाने,जबाबदारी ने व वरिष्ठांच्या आदेश्याने आपले काम करावे,आपल्या तालुक्यात समितीचे कार्यालय असावे,समितीमध्ये महिलांना समाविष्ट करणे,गाव तिथे समितीची शाखा असावी प्रत्येक गावात समितीचे फलक असावे पोलीस कार्यलयास भेट देऊन त्यांचेशी चर्चा करणे,पोलीस विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या मृत्यु झाला असल्यास त्यांच्या परिवारांना भेट देऊन मदत करणे,पोलीस विभागातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना/महिला कर्मचाऱ्यांना होत असलेल्या समस्या बाबत आपल्या स्तरावर निवेदन देणे व ईतर महत्वपूर्ण विषयाबाबत असे मोलाचे मार्गदर्शन याप्रसंगी पाहुण्यांनी केले.माण तालुका अध्यक्ष- संतोष घाडगे.उपाध्यक्ष- युवराज भोसले.शहर अध्यक्ष- राजेंद्र आवटे.महिला अध्यक्ष- चित्राताई गायकवाड. फलटन शहर अध्यक्ष-सपना ताई भोसले.तालुका महिला सचिव – साधनाताई खरात.शहर अध्यक्ष – राणिताई खांडे,जिल्हा उपाध्यक्ष -प्रतिभाताई जगताप यांची प्रमुख पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थित निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सपनाताई भोसले- फलटण शहर अध्यक्षा यांनी, प्रास्ताविक सुभाषजी गायकवाड- सातारा जिल्हा अध्यक्ष यांनी केले तर आभार प्रियंकाताई जाधव सातारा महिला जिल्हा प्रमुख यांनी व्यकृत केले.याप्रसंगी वसंत निकाळजे.दादा जगदाळे सर.संगिताताई जगदाळे व सर्व सातारा जिल्हातील पोलीस परिवार समन्वय समिती च्या पदधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य व मदत केली.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹