घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी येथील रहिवाशी शिवाजीराव भानुदास आबा आर्दड यांचे आज पहाटे चार वाजता औरंगाबाद येथील धुत हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान निधन झाले आहे. राजा टाकळीसह जालना येथील मुख्य टपाल कार्यालयात त्यांनी पोस्ट मास्तर म्हणून नोकरी केली. काही वर्षापूर्वी ते नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, दोन भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे.आज दुपारी 1वाजता त्यांच्यावर राजा टाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजा टाकळी येथील पोस्टमास्तर संभाजी आर्दड यांचे वडील होत.