Home बुलडाणा करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे या वर्षीची सैलानी बाबा यात्रा रद्द,

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे या वर्षीची सैलानी बाबा यात्रा रद्द,

315

 

 

जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश…

अमीन शाह

बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध सैलानी बाबाची ची यात्रा मागील वर्षी कोरोनाचे संकट पाहून रद्द करण्यात आले होते.यावर्षी ही कोरोनाचे वाढते संकट पाहून एप्रिल महिन्यात होणाऱ्या सैलानी यात्रा रद्द केल्याचे निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला असून परराज्यातून येणाऱ्या भाविकांच्या सीमा सील करण्याचे आदेश देण्यात आले आहे.दरवर्षी सैलानी यात्रेत 5 ते 8 लाख पर्यंत भाविक येत असतात..सध्या बुलडाणा जिल्ह्यात झपाट्याने करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत असून सैलानी बाबा यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी श्री , गीते यांनी दिली आहे ,