नकली नोटा जप्त
अमीन शाह
वाशिम , दि. १७ :- .आठवडी बाजारात नकली नोटा चालवितांना दोन संशयीतांना मेडशी पोलीसांनी ताब्यात घेतल्याची घटना शुक्रवार १७ जानेवारी शुक्रवार रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेतील २ आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार रोजी मेडशीचा आठवडी बाजार असतो आज बाजारामध्ये काही संशयीतांनी ५० रुपयाच्याा नोटा देवून लहान व्यापारांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला परंतू एका व्यापाराच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने त्याबाबत संशयतीतास विचारपुस केली असतांना याच सहा व्यापारांच्या लक्षात आले. त्यांनी दोन आरोपींना आठवडी बाजारात असलेल्या पोलिस चौकीमध्ये आरोपींना आणले येथे डयुटीवर असलेले पोलिस कॉन्टेबल सुरेन्द्र तिखीले यांनी खाक्या दाखवला आरोपीकडून झाडाझडतीमध्ये ५० रुपयाच्या २९ नोटा १४५० रुपये पोलिसांनी हस्तगत केले. संशयितांच्या सांगण्यावरुन त्यांची नावे प्रतिक बाबाराव कांबळे २१ रा. पुलगाव कॅम्प वार्ड न ३, वर्धा, दिनेश राजेश देशमुख वय २४ रा.पुलगाव कॅम्प वार्ड न ३, वर्धा, असे नावे असून दोन आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
त्यांच्याकडे चार चाकी वाहन असल्याने पोलिसांनी आपली चक्रे फिरवून नाका बंदी केली असून आरोपीकडून सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय एस. महल्ले, कॉन्टेबल सुनिल तिखिले पुढील तपास करीत आहेत.
या प्रकरणी पोलिसांची कारवाई सुरु आहे मोठे रॉकेट उघड होण्याची शक्यता आहे.