मुंबई दि (प्रतिनिधी) संबंध देशात जातीव्यवस्था प्रस्थापित होत असून दलित मुस्लिम बौद्ध जाती व जमातींवर जीवघेणे हल्ले होत आहेत, सरकारने जातिवाद्यांना आवरले नाही तर आरपीआय डेमोक्रॅटिक अश्या प्रवृत्तींना घरात घुसून ठेचून काढेल असा इशारा पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केला.
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात शिवणी गावात धक्का लागल्याचे कारण सांगुन बौद्ध तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. अत्यंत गंभीर अवस्थेत जखमी मृत्युशी झुंज देत आहे, जखमीला औरंगाबाद येथील सरकारी हाॅस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
देश स्वातंत्र्य होऊन सत्तरी लोटली, तरीही इथली जातिव्यवस्था नष्ट होत नाही. जातीद्वेशातुन आजही कत्तली केल्या जात आहेत, इज्जती लुटल्या जात आहेत, दंगली घडविल्या जात आहेत. मानवतेला कालिंबा फासणाऱ्या घटना देशात सदैव घडत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालुन वेळीच ठोस पाऊल उचलुन आरोपीवर कडक कारवाई करावी. अन्यथा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या वतीने उग्र स्वरूपाच आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.
शिवराय फुले शाहू बसव अण्णा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी आणि रिपब्लिकन जनता असे आघात व प्रहार मुळीच सहन करणार नाही, वेळीच सरकारने अश्या प्रवृत्ती वर रोक नाही लावल्यास डेमोक्रॅटिक पक्षाचे पँथर्स अश्या जातिवाद्यांना घरात घुसून अद्दल घडवतील मग उद्भवणाऱ्या पडसादाला कायदा व सुव्यवस्थेला सरकार जवाबदार असेल असा गंभीर इशारा ही पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.
पक्षप्रमुख कनिष्क कांबले यांच्या नेतृत्वात डॉ राजन माकणीकर, राज्य महासचिव श्रावण गायकवाड, राजेश पिल्ले, मूनवर अली, मनीष यादव असे एक शिष्टमंडळ राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी भेट देऊन या प्रकरणाला थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे सांगितले आहे.
मात्र: हे सरकार कुचकामी ठरले जात आहे, पोलीस यंत्रणा पण कारवाई साठी निपक्षपणे काम करत नाही.
आंबेडकरी रिपब्लिकन जनतेची सुरक्षा करण्यास सरकार असमर्थ असेल तर तसे सांगावे डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रत्येक बौद्ध दलित व वंचित समूहाचे रक्षण करेल व अश्या जातीवादी प्रवृत्तीचा फडश्या पाडेल याची नोंद घेण्याचाही इशारा डॉ. माकणीकर यांनी दिला.