Home विदर्भ मांजरी ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी रेखा चव्हाण यांची निवड

मांजरी ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी रेखा चव्हाण यांची निवड

143

तर उपसरपंच पदी सिंधुबाई टेकाम

यवतमाळ / घाटंजी  – दुसऱ्या टप्प्यातील सरपंच व उपसरपंच निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली यात घाटंजी तालुक्यातील महत्वाची समजल्या जाणाऱ्या मांजरी ग्राम पंचायती च्या सरपंच पदी रेखा सुभाष चव्हाण तर उपसरपंच पदी सिंधूबाई विठ्ठल टेकाम यांची निवड करण्यात आली.

संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या मांजरी ग्राम पंचायती मध्ये दोन गटात चुरशीची लढत झाली. मुरब्बी राजकारणी गटा विरूद्ध ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश कोंडेकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर डंभारे, अशोक राठोड यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली. यात मतदारांनी पारदर्शक गावाचा विकास व्हावा या उद्देशातून या गटाला बहुमताचा कौल दिला. सात सदस्यीय ग्राम पंचायती मध्ये रेखा चव्हाण, सींधुबाई टेकाम, उत्तम रामटेके, प्रिया डंभारे हे या गटाकडून निवडून आले. यासाठी रतन चव्हाण, खुशाल उदार, दत्ता भुरे, विलास अवधुतकार, गणेश अवधूतकार, राजु ठाकरे, देवराव चव्हाण, विलास राठोड, हनुमान मारबदे, अनिल घोडाम, गुणवंत घोडाम, संजय सुरपाम, जितेंद्र अवधूतकार, किशोर नवाडे, दत्ता भोयर, सुभाष डंभारे, गुलाब बुरघाटे, रमेश अवधूतकार यांनी सहकार्य केले. मतदारांनी आपल्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला तडा जाऊ न देता गावाचा सर्वांगीन विकास हेच ध्येय समोर ठेवून कार्य करून गावाची कायापालट घडवून आणू असे मनोदय नवनिर्वाचित सरपंच चव्हाण व उपसरपंच टेकाम यांनी व्यक्त केले.