Home महत्वाची बातमी अनेतीक प्रेम संबनधातून जन्माला आलेल्या मुलीस ठार मारून फेकून दिले

अनेतीक प्रेम संबनधातून जन्माला आलेल्या मुलीस ठार मारून फेकून दिले

193

त्या डायन राक्षसनी मातेला अटक

अमीन शाह

रत्नागिरी , दि. १७ :- अनैतिक संबंधातून जन्माला घातलेल्या नवजात मुलीला मातेनेच अंत्यंत कृरपणे ठार मारून खाडिकिनारी टाकून दिल्याची घटना रत्नागिरीतल्या वरवडे गावात उघडकीस आलीय .

या प्रकरणी संबंधीत महिलेला अटक करण्यात आली असून या कृर गुन्ह्यात या महिलेसोबत आणखी कोण सहभागी आहेत का याचा तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहे . या महिलेने 21 डिसेंबर 2019 ला एका मुलीला जन्म दिला होता आणि 22 डिसेंबरला या मुलीला अत्यंत निर्दयपणे ठार करुन तिला खाडीकिनारी असलेल्या खाजण भागात्त फेकून दिले होते. गावकऱ्याना हे अर्भक आढळल्यानंतर पोलीसांच्या आणि आशा सेविकां पोलीस पाटलांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरु होता.

अखेर या महिलेला अटक करण्यात आली असून तिला न्यायालयाने तिला पोलीस कोठडी दिली आहे . मातेनेच क्रौर्याची परिसीमा पार करुन नवजात मुलीला मारल्यामुळे या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या इतर आरोपीनाही अटक करा अशी मागणी संतप्त गावकऱ्यानी केली आहे.