Home महत्वाची बातमी चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल ,

चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल ,

427

 

 

पोलीसवाला न्युज नेटवर्क ,
राज्यात भाजपची सत्ता असताना चित्रा वाघ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांचे पती किशोर वाघ यांना 4 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आता बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने किशोर वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सध्या पूजा चव्हाण हिच्या मृत्यु प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आवाज उठवत आहेत. किशोर वाघ यांना 2016 मध्ये 4 लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेची तपासणी सुरु करण्यात आली होती. काही दिवसांनी खुल्या चौकशीला सुरुवात झाली होती. चित्रा वाघ यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी आपल्या पतीला वाचविण्यासाठी चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात होते.
मात्र, निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाआघाडी सरकार सत्तेवर आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची ही चौकशी तशीच पुढे सुरु राहिली. याप्रकरणी तपास अधिकारी जगताप यांनी 12 फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली आहे. या चौकशीत किशोर वाघ यांची मुंबई, पुणे, नाशिक येथे बेहिशेबी मालमत्ता असल्याचे तपासातून उघड झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणी आवाज उठवत असल्याने हा गुन्हा दाखल झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे.