Home विदर्भ विदर्भ मराठवाडा च्या सिमेवर असलेल्या सायफळ येथून मोठ्या प्रमाणात अैवध रेती तस्करी

विदर्भ मराठवाडा च्या सिमेवर असलेल्या सायफळ येथून मोठ्या प्रमाणात अैवध रेती तस्करी

138

यवतमाळ / घाटंजी  – तालुक्यातील सायफळ गावाच्या सीमेवर वरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रात विदर्भ मराठवाड्यातील अनेक गावातील रेती चोरट्यांनी रात्रभर अैवध रेती उपसा करून मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे उनकेश्वर सायफळ पैनगंगा पात्रांमध्ये दहा ते पंधरा ट्रक्टर द्वारे रात्रभर रेती चा उपसा करून उनकेश्वर मार्गे दरसांगवी मोहाडा लिंगी उमरी बाजार तर सक्रूनाईक पार्डीतांडा मार्गे दुर्गापेट गोल्लापेट सह घाटंजी तालुक्यात येणाऱ्या गोविंदपूर चिखलवर्धा सायफळ येथे रात्री ९ चा नंतर केली जाते अैवध रेती ची वाहतूक मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अैवध रेती तस्करी सामान्य नागरिकांना दिसते मात्र १० ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या पारवा व किनवट तालुक्यातील माडंवी पोलीसांना दिसत नाही हे आश्चर्यकारक च आहे किनवट सह घाटंजी महसूल विभाग लक्ष देवून रेती तस्करावर कारवाई करावी अशी मागणी किनवट व घाटंजी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.