प्रशासनाच्या हलगर्जीपणा मूळे लोक बिनधास्त ,
बुलडाणा
अमीन शाह ,
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील पोलीस ठाण्याचे दुय्यम ठाणेदार दीपक राणे यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने दीपक राणे यांच्या संपर्कात आलेल्यांनी आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.दरम्यान ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनीही आपला स्वब दिल्याची माहिती आहे . सर्वत्र करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पोलीस अहोरात्र जनतेला सुरक्षित राहण्याचे आवाहन करतानाच जीवाची बाजी लावून रस्त्यावर पहारा देत आहेत अशातच पोलीसांना देखील करोनाच्या विळख्यात अडकावे लागत आहे तेव्हा जनतेने संचारबंदीचे पालन करून करोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी केले आहे .
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांनी तारीख २६ फेब्रुवारी रोजी आदेश निर्गमित करून शनिवार व रविवारी रोजी दुकाने , आस्थापने , प्रतिष्ठाने , बंद राहण्यासाठी आदेश केला होता.परंतु जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांच्या आदेशालाच सिंदखेड राजा तालुक्यामध्ये प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे पहायला मिळत आहे . सिंदखेड राजा तालुक्यामध्ये सद्या ग्रामीण भागामध्ये झपाट्याने कोरोनाचा प्रसार होतांना दिसुन येत असुन त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आज आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारी नुसार सद्या तालुक्यामध्ये ८० कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण आहेत . त्यामध्ये तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ४६ तर शहरी भागामध्ये ३४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत .
साखरखेर्डा ,
स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षपणा मुळे येथे नागरिक बिनधास्त विना मास्क फिरतांना दिसून येत आहे मेन रोड बस स्टँड वरील अनेक प्रतिष्ठाने खुली असल्याचे दिसत आहे येथे सध्या करोना चे पाच ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती असून परिसरातील सिंदि , सवडत , मोहाडी , सेंदुर्जन येथे ही ऐकटिव्ह रुग्ण आहेत पोलीस प्रशासन , आरोग्य प्रशासन , ग्राम पंचायत प्रशासनाने येथे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे , येथे जर असाच सुरू राहिला तर करोना अधिक वेगाने पसरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे ,