Home विदर्भ देवळी तालुक्यात अवैध वाळू उत्खनन जोरात, शासनाच्या नियमाची पायमल्ली.

देवळी तालुक्यात अवैध वाळू उत्खनन जोरात, शासनाच्या नियमाची पायमल्ली.

288

 घाटात राजकीय पक्षाच्या व्यकतिचा समावेश असल्याचा संशय.


वर्धा जिल्हा देवळी तालुक्यातील हिवरा कावरे येथे असलेल्या वाळू घाटात शासनाच्या नियमाची पायमल्ली होन्याचे चित्र दिसुन येत आहे. या वाळू माफियांना काहि राजकीय पक्षाच्या व्यक्तीचा पाठभार असल्याचे चर्चेला उदान आले आहे.

या वाळू घाटावर सर्रास पणे सेक्शन बोर्ड व मोठ मोठ्या जे. सी. बी आणी पोकलँन्ड मशिनिच्या सहाय्याने वाळू उपसा सुरु असुन शासनाच्या नियमाची पायमल्ली करन्यात येत आहे आणि नदिला थड्याचे स्वरुपात बदलवन्यात येत असल्याचे चित्र या छायाचित्राद्वारे समजते. वाळु माफियांकडून सर्रास वाळूचा उपसा सुरु असून दिवसरात्र वाळूचे उत्खनन सुरु आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असून वाळू माफिया आणि अधिकार्यांचे साटेलोट असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.

नदी सुखल्याने पोकलेन, जेसीबी तसेच ईलेक्ट्रिक बोटीच्या सहाय्याने वाळूचा उपसा करू नये, असे स्पष्ट आदेश न्यायालयाचे असतानासुध्दा या मशिनीद्वारे
वाळूचा अवैध उपसा केल्या जात आहे. यावर जिल्हा खनीकर्म विभागातील अधिकारी, कर्मचार्यांनी कारवाई करणे गरजेचे आहे पण ते सध्या कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे. देवळी तालुक्यातील वर्धा नदीपात्रातून दिवसरात्र अवैध वाळू उपसा सुरू आहे. मात्र याकडे संबंधीत विभागाचे सपशेल दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 येथील काहि रेत घाट सार्वजनीक बांधकाम विभाग वर्धा याच्या साठी राखिव करन्यात आलेले आहे परंतु त्या राखीव घाटाच्या नावांर हे वाळू माफिया चोरट्या मार्गाने रात्रदिवस शासनाचे महसुल बुडवन्यात मग्न आहे. शासनाने सबंधितांवर योग्य कारवाई करन्याचि मागनी होत आहे.

येथील संबधित घाटावंर शासनाकडून सि. सि. टि. व्हि कँमेरे लावन्यात व्यावे