Home मराठवाडा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवू तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे – शिवश्री...

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवू तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे – शिवश्री गणेश फरताडे

254

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील भादली येथे ग्रामस्थांच्या वतीने २४ फेब्रुवारी, बुधवार रोजी शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला .यावेळी सर्वप्रथम येथील सदानंद महाराज मठाचे मठाधिपती- अवधेशानंद सरस्वतीजी महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला .उपस्थित सर्व ग्रामस्थांनी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय…जय भवानी… जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या.या निमित्त्याने छत्रपती शिवरायांचे शिवचरित्र शिवश्री गणेश फरताडे यांनी कथन केले. या यानिमित्ताने ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे,आनंदी जीवन जगावे. असे त्यांनी सांगितले .छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून उद्योग व्यावसायात पडुन आई वडिलांचे स्वप्न‌ साकार करावे असे आवाहन त्यांनी केले.सध्या तरुण हा भरकटलेल्या अवस्थेत असून त्याला विचारांची गरज आहे. सर्व तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र वाचून आपले जीवन सुधारावे असे त्यांनी या प्रसंगी सांगितले.
कार्यक्रमास गावक-यांनसह युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्र सुत्रसंचालन श्रीहरी जगताप यांनी केले. तर आभार अशोक तळेकर यांनी मानले.