अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने केली ‘तो ठराव रद्द करण्याची मागणी’
रवींद्र साखरे
वर्धा जिल्हा परिषदेने ठराव पारित करुन पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अफलातुन प्रकार केला असुन ‘तो ठराव त्वरीत रद्द करा’ अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने येथील उपविभागीय अधिकारी हरिष धार्मीक यांना शुक्रवारी (ता.२६) निवेदन देवुन केली आहे.
वर्धा जिल्हा परिषदेने २४ डिसेंबर २०२० ला स्थायी सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक १० पारित केला आहे. या ठरावाच्या माध्यमातुन पत्रकारांना मिळालेल्या कायदेशीर अधिकारावर गदा आणण्याचा अफलातुन कारभार केला आहे. परिश्रम घेवून, माहिती गोळा करुन त्याला प्रसिध्दी देणे आणी भ्रष्टाचाराला उघड करणे हा पत्रकारांचा हक्क आहे. यामुळे अनेक भ्रष्टाचारांचे प्रकरण उघडकीस आले असुन याचा देशाला व राज्याला लाभ पोहचला आहे. तर, प्रशासकीय यंत्रणेला सुध्दा अनेकवेळा मदतच झाली आहे. मात्र वर्धा जिल्हा परिषदेने ठराव पारित करुन यावर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला असुन याचे कारण मात्र कुणालाच कळले नसल्याने शंकाकुशंकेला पेव फुटले आहे तर वृत्तपत्र क्षेत्र व वाचकांच्यामाध्यमातुन यावर संताप व्यक्त केला जात आहे.
या अफलातुन ठरावाचा निषेध करीत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या येथील शाखेने उपविभागीय अधिकारी हरिष धार्मीक् यांच्या मार्फत वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना निवेदन पाठुन २४ डिसेंबर २०२० चा ठराव क्रमांक १० रद्द करण्याची मागणी केली आहे.
निवेदन देणाऱ्यात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य सल्लागार समीती अध्यक्ष अनिल जोशी, सचीव दशरथ जाधव, तालुका अध्यक्ष सुशीलसिंह ठाकुर, डॉ. श्यामसुंदर भुतडा, विजय अजमिरे, सुर्यप्रकाश भट्टड, पुरूषोत्तम नागपुरे, प्रा.अभय दर्भे, परवेज साबीर, उदय बाजपेयी, संजय पाटणी, विजय झेंडे, सचीन पाटणी, संदिप जैन, गौरव कुऱ्हेकर, सुनील पारसे, प्रमोद डोळस, दिनेश लायचा, अरवींद लिल्लोरे, डॉ. प्रकाश राठी आदिंचा समावेश आहे.