Home मराठवाडा विद्यार्थ्यांना वार्षिक नेटपॅकसह मोबाईल देवून डोळ्यांची नियमित तपासणी करण्यात यावी

विद्यार्थ्यांना वार्षिक नेटपॅकसह मोबाईल देवून डोळ्यांची नियमित तपासणी करण्यात यावी

172

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

कोरोना महामारीच्या संकटामुळे शाळा बंद असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.पर्यायी व्यवस्था म्हणून शासनाने आॅनलाईन अभ्यास क्रम सुरू केला आहे.

त्यासाठी सर्व सामान्य आणि गरिब लोक अॅनराॅईड मोबाईल घेवू शकत नाहीत शासनाने विद्यार्थ्यांना वार्षिक नेटपॅकसह मोबाईल फोन उपलब्ध करून देण्यात यावा आणि विद्यार्थ्यांची नियमित डोळे तपासणी करण्यात यावी अशी मागणी युवा कार्यकर्ते किशोर मुन्नेमाणिक यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.तसेच घनसावंगी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात कार्यरत सहशिक्षक यांची शाळेवर नेमणूक करण्यात यावी.शालेय विद्यार्थ्यांना आॅनलाईन अभ्यासक्रमासाठी अॅनराॅईड मोबाईल शासनाच्या वतीने देण्यात यावा ,तसेच डोळ्यांची नियमित तपासणी करण्यात यावी.