नांदेड (प्रतिनिधी) – चंद्रपूर जिल्ह्यातिल दारुबंदी कायम ठेवावी, दारुबंदी विषयक कायदे अधिक कडक, मजबुत, सक्तीचे करावे. यासह ईतर मागण्याचे निवेदन अल ईम्रान प्रतिष्ठानचे इंजि.ईम्रान खान पठाण यांनी केंद्रिय सामाजिक न्यायमंञी रामदासजी आठवले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ते नांदेड दौऱ्यावर आले असताना केली आहे.
नांदेड जिल्ह्यासह बिलोली तालुक्यात अल ईम्रान प्रतिष्ठान बिलोली हि संस्था व्यसनमुक्ती, तंबाखूमुक्ती, दारुबंदी, गुटखा यासह सर्व व्यसनाच्या विरुध्द गेल्या काही वर्षापासून नि:स्वार्थ पणे काम करित आहे. सध्या महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारुबंदी आहे. तश्याच प्रकारची दारुबंदी नांदेड जिल्ह्यात सुध्दा करण्यात यावी. चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीमुळे अनेक चांगल्या गोष्टी घडून आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेत आमुलाग्र बदल झालेला आहे. अपघातांचे,कौटुंबिक कलह,वादविवाद, हिंसाचाराचे प्रमाण कमी होणे, व दंगामुक्त सण आणि निवडणूका, नाल्यात राहणाऱ्या मद्यपींची संख्या कमी झाली. बायको व मुलांवर अत्याचार कमी झाला असल्याचे दिसून येत आहे. हजारो लोक व्यसनमुक्त झाले आहेत. तसेच रोज दारुवर व ईतर व्यसनावर होणारा खर्च वाचला व तो पैसा दैनंदिन कामावर खर्च होऊ लागला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीची अधिक सक्षमपणे, कडक अंमलबजावणी होण्यासाठी सध्याच्या कायद्यात बदल करावा, मुंबई दारुबंदी कायद्याचे कलम-७ प्रमाणे समित्याचे गठन करणे, स्वतंत्र पोलीस दलाची स्थापना करणे, फाॕरेन्सिंक लॕब तयार करणे, व्यसनमुक्ती उपचार केंद्र व जनजागृती करणे, जिल्ह्यामध्ये सुकाणू समितीची स्थापना करणे, अट्टल दारु विक्रेत्यांवर कारवाई करणे आदी मागण्याचे निवेदन प्रतिष्ठानचे ईजि. ईम्रान खान पठाण यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिले आहे.
सदरिल निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंञी, मंञी राज्यउत्पादन शुल्क, जिल्हाधिकारी चंद्रपूर, तहसिलदार यांना देण्यात आले. यावेळी रिपाई चे नेते डॉ सिद्धार्थ भालेराव,जिल्हा अध्यक्ष मिलिंद शिराढोनकर,पत्रकार जी.जी.गच्चे, बेग, उदय नरवाडे,अविनाश पाईकराव, मिलींद सोनसले, मिर्जा आजम बेग,समाज कल्याण कार्यालयाचे कनिष्ट सहायक दवने आदींची उपस्थिती होती.
व्यसनमुक्तीच्या कामाचे कौतुक
जिल्हा समाज कल्याण अधिकारी तेजस माळवदकर यांनी केंद्रींय मंञी महोदयांना अल ईम्रान प्रतिष्ठान ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून व्यसनाविरुध्द काम करित आहे. तसेच जिल्ह्यातिल अल्पसंख्याक, मागासवर्गिय, दिव्यांग, फासे पारधी समाजाच्या लोकांसाठी विविध स्तरावर केलेले कार्य अहवाल दाखवून आठवले यांना सविस्तर माहिती देऊन कामाचे कौतुक केले. यावेळी रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजयदादा सोनवणे व रिपाई चे नेते डॉ सिद्धार्थ भालेराव यांनी ही सदरील कामाचे कौतुक केले.