Home जळगाव पाल येथे रावेर पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न.

पाल येथे रावेर पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न.

723

रावेर (शरीफ शेख)

पाल ता रावेर दि, 3/3/2021, बुधवारी दुपारी 3-00, वाजता पाल येथे मासिक सभेमध्ये रावेर पत्रकारांची बैठक तालुकाध्यक्ष विलास ताठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी विशेष मार्गदर्शक उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रवीण सपकाळे,तर विभागीय उपाध्यक्ष भूषण महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे, व्यासपीठावर उपस्थिती होते,
विभागीय अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यांत त्यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटन ध्येयधोरणे सभासद वाढवणे व संघातर्फे समाजोपयोगी उपक्रम, तसेच रावेर तालुका पत्रकार
संघटनेची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचे नमूद करून
सर्व रावेर तालुका पत्रकार बंधू प्रती आभार व्यक्त केले,
तर पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि एप्रिल महिन्याच्या अखेरीस खिरोदा येथे रावेर विधानसभा क्षेत्रातील सर्व पत्रकार बंधूंचा मेळाव्याचे आयोजन करावे, त्यांत सहभागी सर्व पत्रकार बंधुंचा अपघाती विमा काढला जाईल, तसेच वरिष्ठ तज्ञ पत्रकार बंधुंचे व्याख्यान आयोजित करून
चर्चासत्र, नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, यासाठी मी स्वतः सर्व परिने मार्गदर्शन करुन यशस्वी नियोजनासाठी संपूर्ण सहकार्य करीन, भविष्य सर्व पत्रकार बंधुंच्या पाल्यांना दप्तर, वह्या,कंपास बॉक्स उपलब्ध करून वाटप करण्याचे विधयाक कार्य संघटनेच्या माध्यमातून आपण सर्व मिळून करु , तसेच वुंत्तपत्रे विक्रेते यांना ही मदत करुन समाजात आदर्श निर्माण करणारे कार्य अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहावे अशी आशा व्यक्त केली. तसेच महाराष्ट्र पत्रकार संघटनेच्या वतीने लवकरच नोंदणीकृत सदस्य यांचे ओळख पत्र वाटप करण्यात येईल,
अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली .
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल,
सल्लागार सरदार पिंजारी, कोषाध्यक्ष रविंद्र महाजन, गणेश पाटील,प्रमोद कोडे , महेंद्र पाटील,अजिज शेख, शरीफ शेख ,सुरेश पवार, मनिष चव्हाण, पुनमचंद जाधव, गणेश भोई, मनिष बाविस्कर, लक्ष्मण ठाकूर सर, भानुदास भारंबे, युसूफ शहा, शेख फरीद, हमीद तडवी, वैभव काटकर, कैलास लवगंडे, सह अनेक रावेर तालुक्यातील पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होते,
सदर यावेळी सूत्रसंचालन संतोष नवले , प्रास्ताविक योगेश सैतवाल यांनी तर आभार शरीफ शेख यांनी मानले.