मायाताई नाशिकच्या या पवित्र भूमीत स्वतःच्या खडतर आयुष्यात,झोपडपट्टीत,वाढलेली महिला,
बालपणापासून बरंच जीवन कचरा वेचन्यात गेलं,
जिज्ञासूंवृत्ती व आत्मविश्वासाच्या जोरावर अभिव्यक्ती संस्थेत मायाताईंनी शिकलेला व्हिडीओ कैमरा,अन मायाताईंचा तेथुन सुरू झाला सामाजिक प्रवास,अहो झोपडपट्टीतील ड्रेनेजचे रस्त्यावर वाहणारे पाणी,गरिबांच्या घरच रेशन,अशा कित्येक विषयावर त्यांनी व्हिडीओ स्टोरी केल्या अन त्यामाध्यमातून त्यांचा व्हिडिओ वोलेंटीअर म्हणून इंडिया अनहर्ड या न्युज माध्यम संस्थेशी जोडणे यातून त्यांचा समुदाय पत्रकरितेचा प्रवास थक्क करणारा आहे,
हजारो असे प्रश्न अश्या व्हिडीओ स्टोरी त्यांनी केल्या की मूळ प्रवाहातील पत्रकारांना कधीही न दिसलेले जाणवलेले कित्येक मुद्दे त्यांनी आपल्या व्हिडीओ तुन हाताळले,त्यातून कित्येक विषयाला वाचा फोडली, कित्येक मुद्दे त्यातून मार्गी लागले,
आम्ही पत्रकार बातमी देतो,
मोकळे होतो, मात्र मायताई मूलभूत ज्वलंत मुद्द्यावर शोषित दुर्लक्षित समुदायाचे मुद्दे घेऊ व्हिडीओ करतात व त्या माध्यमातून राष्ट्रीय वहिनी दूरदर्शन मार्फत त्यांना वाचा फोडतात,व प्रश्न सुटेपर्यंत स्वतः पाठपुरावा करताय,त्यांच्या बातमीतून सामाजिक सपोर्ट मिळवतात,अन प्रश्न सुटताच,त्यावर इम्पॅक्ट व्हिडीओ करतात,असे हजारो स्टोरीज त्यांनी केल्या,
तुम्ही म्हणाल कुठली पदवी नाही,साधे प्राथमिक शिक्षण पुरते नाही हो, केवळ आत्मविश्वास व जिद्द त्यांनी खडी उतरवली,
अन स्वतःला सिद्ध केले,अहो सामाजिक बदलाची पत्रकारिता करताना त्यांना,कधी कुठल्याही अपेक्षा नाही नव्हत्या,केवळ दुःखी कष्टी माणसाला न्यायासाठी झगडणारी ही महिला म्हणजे खरीखुरी नाशिकची आयकॉन आहे,
मायाताईंची कित्येकदा रेडिओ,तसेच बीबीसी लंडन या रेडिओला चॅनल ला,प्रादेशिक चॅनलला स्टोरी आल्या प्रवास आला,तो प्रेरणादायी खडतर असामान्य होता,आहे,
मायताई आजही तितक्याच सक्रिय आहेत, अडचणीत झोपडपट्टीतील महिलांना आधार त्या बनतात, तसेच डम्पिंग ग्राउंड वरील कित्येक कचरावेचक महिलांना त्यांनी पाठपुरावा करुन नाशिक महापालिकेकडून शासकीय ओळखपत्र मिळवून दिले,”पुकार फिल्म प्रोडक्शन च्या “सपान सरल”ह्या आगामी मराठी चित्रपटांच्या त्या नायिका तसेच सहनिर्मात्या आहेत,
आपल्या आयुष्यात बदल होत असताना,झोपडपट्टीत राहून समाजातील सामान्य जीवन त्यांनी सोडले नाही,दारिद्र अडचणी कितीही असल्या तरी सामाजिक अडचणीत त्या नेहमी सामान्य गरिबांच्या सोबत असतात,कोरोनाच्या संकटात मायताईंची दातृत्वाची हिम्मत बघाल तर अहो राज्यभरातील सामाजिक मित्रांच्या मदतीने त्यांनी हजारो गोरगरीब निराधार परिवाराना किराणा वाटला,व गावोगावी पाड्यावर ही तो गरजुना दिला.
एकूणच मायताई कित्येक महिलांना मार्गदर्शन करतात,त्यांच्या सहवासात जाऊन त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून घेण्याची आजच्या महिलांना गरज आहे,शिक्षणाने माणसे किती मोठी होता माहीत नाही मात्र शिक्षणापेक्षा अधिक प्रगल्भ सामाजिक जाणिव असल्याचं भान असणाऱ्या कर्तुत्ववान मायाताई नाशिकच्या मातीतील सोने आहे हे तितकेच खरे…
मायाताई तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा,
तुमच्या कार्यात आम्ही कायमच सोबत असतो असणार
हा आमचा कर्तव्याचा भागच आहे..
आपला:/राम खुर्दळ,(पत्रकार)9423055801.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1510800975714894&id=1218471521614509