ईकबाल शेख
वर्धा जिल्हा आर्वी तालुका येथील एक व्यावसायिक परप्रांतातून स्वतःच्या प्रतिष्ठान मध्ये आलेल्या गाड्या ३ दिवस झाले तरी सोडायला तयार नाही. तीन दिवसापासून त्या गाड्यांचे चालक वाहक त्या व्यावसायिकाच्या घरासमोर चकरा मारत आहे. उपाशी तापाशी त्यांच्या मागे फिरून त्याला विनंती करत आहे पाया पडत आहे. मात्र पैशाची मस्ती असलेला व्यावसायिक आपल्याच मग्रुरीने त्यांच्याशी वागत होता.. सदर व्यावसायिकाच्या एका दलालाशी काही कारणामुळे बिनसले होते. मात्र त्या दलालाचे काही ही वेडे वाकडे न करता गरीब ड्रायवर च्या गाड्या स्वतःच्या मालकीच्या जागेत ठेऊन घेऊन त्या गाडीवाल्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी ज्याला या महाराष्ट्रात कुणी नाही त्याचा वाली प्रहार आहे या उक्तीप्रमाणे सर्व गाड्यांचे ड्रायवर यांनी प्रहारचे संघटनेचे बाळा जगताप यांची भेट घेऊन आपली करून कहाणी कथन केली तेव्हा बाळा भाऊ जगताप यांनी आपल्या पद्धतीने प्रकरण हाताळून त्या ड्रायवर लोकांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला व त्याच्या गाड्या त्या व्यावसायिकाच्या ताब्यातून सोडून देण्यात आल्या. तेव्हा सर्व ड्रायवर यांनी बाळा भाऊ जगताप यांचे आभार व्यक्त करताना आपल्या आसवांना वाट मोकळी करून दिली.