Home विदर्भ वाळू वाहतुकीची वाहने मोकाट, वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यात गौडबंगाल?

वाळू वाहतुकीची वाहने मोकाट, वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यात गौडबंगाल?

792

अंधाराचा फायदा घेत ईतर जिल्ह्यात पोहचविली जाते अवैध वाळू.

ईकबाल शेख

वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहर परिसरामध्ये वाळूचा उपसा आणि वाहतूक सुरू असून वाळूची शहरात सर्रासपणे विक्रीही सुरू आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या या वाहनांवर कायमचा चाप लावण्या ऐवजी महसूल प्रशासन केवळ दंड वसूलीत व्यस्त असून पोलिस प्रशासनही सुस्त आहे.
अवैध गौण खणिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली महसूल, पोलिस व आरटीओ अधिकारी समितीही कागदावर असून प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे वाळूची सर्रास वाहतूक व विक्री करण्यात येत आहे.
आर्वी शहरात ट्रक, हायवे ट्रकच्या माध्यमातून पुलगाव रोड, देउरवाडा या मार्गांवरून शहरात व शहराच्या बाहेर वाळू आणली व पोहचवली जाते. ठिकठिकाणी ट्राफिक पोलिसांची तैनाती असतांना वाळू वाहतुकदार सहज शहरात वाळू घेऊन येतात व महापालिका हद्दीत बेकायदा वाळूचे साठे करण्यात येते.
वाळूबंदीच्या नावाखाली मनमानी करत जादा दराने वाळूची विक्री करून नागरिकांची पिळवणूक करण्यात येते. या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना असले तरी महसूल विभागाने मात्र या वाळू चोरीकडे सपशेलपणे पाठ फिरविली आहे
शहरातही दररोज लहान मोठे अपघात होतात. वाळूच्या या बेलगाम वाहतुकीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.