ईकबाल शेख
वर्धा – कर्ज पुनर्गठन खात्यामध्ये रक्कम उपलब्ध करून नव्याने पीक कर्ज योजनेचे त्वरित अंमलबजावणी करून दिल्या बाबत तसेच शासनदरबारी सातत्य पाठपुराव्यामुळे माजी आमदार अमर काळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्यातील महा विकास आघाडी सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत सरसकट दोन लाखांच्या आतील थकबाकी शेतकऱ्यांना पात्र धरले होते. परिणामी पाच ते सहा महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा शासनाकडून शेतकऱ्या बाबत निर्णय घेतला नाही यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनवर खोड किडी च्या प्रादुर्भावामुळे तसेच कपाशीवर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात कमालीची घट झालेली आहेत. ेणार्या हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना बी, बियाणे, खते आदी साठी पैसा कुठून उपलब्ध करावा हा यक्ष प्रश्न उभा होता या समस्याचे निराकरण करण्यासाठी तळेगाव येथील शेतकरी बांधवांनी माजी आमदार अमर काळे यांना सहीनिशी स्वाक्षरी केलेले निवेदन दिले. याबाबत गांभीर्याने लक्ष घालून शासन दरबारी सातत्य पाठपुराव्यामुळे नवीन पीक कर्ज योजनेची त्वरित अंमलबजावणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेतकरी बांधवाकडून दिलासा व्यक्त करण्यात येत आहे. सदर समस्या निकाली काढण्याबाबत तळेगाव येथील शेतकरी बांधव दिलीपभाऊ राठी, चंदू भाऊ इंगळे, मधुसूदन नागपुरे, प्रशांत मुळे, विनोद खोपे, जमील खान पठाण, राजेश करोले, भारत सिंग टाक, संजय भुजाडे, विलास कोहळे, गोविंदा बुले, फत्तेसिंग जुने, सुमित भुयार, प्रज्वल टरके, पराग भित्रे, आदींनी आभार व्यक्त केले आहेत.