सभासदांची जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार , जाधव यांच्या अध्यक्षपदावर आक्षेप
यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक आमसभा २१ मार्च २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. हि आमसभा राजूदास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होती आहे.
मात्र जाधव हे जिल्हा परिषदेच्या सेवेतून दि.२८ फेब्रुवारी २०२१ रोजी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेणे बेकायदेशीर असून ती रद्द करण्याची मागणी संस्थेच्या सभासदांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.
पतसंस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेच्या सभासदत्वासाठी उमेदवार जिल्हा परिषद सेवेत कायम सेवक असण्याची तरतूद आहे. विद्यमान अध्यक्ष हे आता जिल्हा परिषदेच्या सेवेत नसल्याने ते संस्थेच्या सभासद व संचालक पदावर राहू शकत नाही.
त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक आमसभा घेणे पतसंस्थेच्या नियमांचा भंग करणारे आहे. त्यामुळे ७ मार्च २०२१ रोजी काढण्यात आलेली वार्षिक सर्वसाधारण सभेबाबतची नोटीस रद्द करण्यात यावी अशी मागणी सभासदांनी केलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे.
आमसभा घ्यायचीच असेल तर विद्यमान संचालकांमधून नवीन अध्यक्षांची निवड करून किंवा कोणत्याही सामान्य सभासदाच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा घेण्यात यावी आणि तशी सुधारित नोटीस काढण्यात यावी अशी मागणी मधुकर काठोळे, ज्ञानेश्वर नाकाडे, मुकेश भोयर,संजय गावंडे,रमाकांत मोहरकर,किरण मानकर,साहेबराव पवार शरद घारोड,शशिकांत लोळगे, शेरू सैय्यद, दिलीप कुडमेथे, तेजस तिवारी, यांनी केली आहे.
Post Views: 648