शरीफ शेख
रावेर , दि. १८ :- संपूर्ण भारतात सुरू असलेल्या भारतीय नागरिकत्व कायद्याचा विरोध म्हणून हम भारताचे लोक या छत्राखाली भारतातील १०६ सनदी अधिकाऱ्यांनी भारतीयांना एका पत्राद्वारे आव्हान केलेले आहे की भारतीय नागरिकत्व कायदा, एन आर सी व एन पी आर हा आज देशासाठी आवश्यक नसून जे प्रश्न आवश्यक आहे त्यावर सरकार लक्ष केंद्रित करीत नसल्याने आज त्यांच्या आव्हाना नुसार संपूर्ण जळगाव जिल्ह्यात दुपारी तीन ते पाच या दरम्यान तहसीलदार, प्रांत व जिल्हाधिकारी कार्यालय समक्ष धरणे आंदोलन करण्यात आले.
जळगाव शहरात पाच ठरवा सहित केन्द्र शासनाला व महाराष्ट्र शासनाला दोन वेगवेगळे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री यांना एन पी आर ची माहिती संकलन करण्यास केन्द्रला नकार कलववा व सी ए ए रद्द करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली तर केंद्र शासनास भारतीय नागरिकत्व कायदा रद्द करण्यात यावा व एन आर सी, एन पी आर लागू करु नए अशी मागणी करण्यात आली
जळगाव शहरात धरणे आंदोलनाची सुरुवात कासिम उमर यांच्या एन आर सी गीताने करण्यात आली तर मुजाहिद शेख यांनी गीत सादर केले.
मराठा क्रांती चे विनोद देशमुख यांनी प्रस्तावना द्वारे आज संपूर्ण जिल्ह्यात धरणे आंदोलन का केले जात आहे त्याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्लिम मंच चे फारुक शेख यांनी केले तर आभार अयाज अली यांनी मानले.
यांचे झाले मार्गदर्शन
कुल जमाती तर्फे मुफ़्ती खालीद, शहरे काजी मुफ़्ती अतिकउर रहेमान, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मनीष जैन, अशोका बिग्रेडचे संजय दानवे, काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस हरपाल सिंग चुडासमा, वंचित आघाडीचे भारत ससाने, जळगाव नगरपालिकेच्या माजी उपाध्यक्ष मुमताज हुसेन खान, इकरा कॉलेजच्या प्राध्यापक सौ अंजली कुलकर्णी, प्राध्यापिका डॉक्टर फिरदोस सिद्दिकी, पटेल बिरादरी च्या जैनब पटेल, मदरसा बकीयतुत सालेहा च्या हिना शेख, सुन्नी जमातीचे शरीफ शाह, चाळीसगाव राष्ट्रवादीचे नेते प्रमोद पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, कॉलेज तरुणी आफ्रिन शेख युसुफ सालेह अय्यूब शहा , करीम सालार ,गफ्फार मलिक व लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
जळगाव मधे तीन ठिकाणी निवेदने देण्यात आली.
१)जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात मुमताज हुसेन, प्रोफेसर डॉक्टर फिरदौस सिद्दिकी, तबस्सुम खान, माजी आमदार मनीष जैन, विनोद देशमुख, फारुक शेख, गफ्फार मलिक, करीम सालार, मुफ़्ती हारून यांनी निवेदन दिले.
२) प्रांत कार्यालयात शेतकरी संघटनेचे सचिन धांडे यांच्या नेतृत्वात एडवोकेट जमील देशपांडे, जफर शेख पिंच बॉटलिंग , हुजेर शेख , सय्यद शाहिद, फारूक कादरी ,तय्यब शेख ,अमजद पठाण, जाकीर शेख ,जहांगीर खान यांनी प्रांत कार्यालयात निवेदन दिले.
३)तहसील कार्यालयात फारूक अहलेकार यांच्या नेतृत्वात शरीफ शाह, इक्बाल शेख वजीर, शाहिद शहा, फिरोज खान, बासिद खान यांनी निवेदन दिले.
जळगाव येथील आंदोलनात पाच ठराव मंजूर – पहिला ठराव- केंद्र सरकारने आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशातील तरुणांच्या हातात काम द्यावे.
दोन -पश्चिम बंगाल केरळ या राज्याचा अभिनंदन करून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुद्धा पुनर्विचार करण्याची मागणी चा आभार व्यक्त करून त्यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले तीन- शाहीन बाग दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात भारतीय मुस्लिम महिलांनी जी शक्ती व एकता दाखवली त्यांच्या त्या धाडसाला या सभेने क्रांतिकारी सलाम करून त्यांचे सुद्धा अभिनंदन केले.
चार- १एप्रिल पासून सुरु होणाऱ्या एन पी आर मध्ये माहिती देता कामा नये जोपर्यंत केंद्रसरकार एन आर सी व सी ए ए रद्द करुन गॅजेट करत नाही तोपर्यंत पाच -उत्तर प्रदेश मध्ये या पद्धतीने लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे त्याचा निषेध करून आंदोलनकर्त्यांना तात्काळ सोडवण्यात यावे अशी एकमुखी मागणी करण्यात आली
वरील पाच ठराव फारुक शेख यांनी हजारो उपस्थित आंदोलकांचे समोर वाचून दाखवले असता त्यात उपस्थित समुदायाने होकार आर्थिक उत्तर देऊन त्यास मान्यता दिली.
यशस्वीतेसाठी कार्यरत तरुण
सदर धरणे आंदोलन यशस्वीतेसाठी इमरान फारिस, कासिम उमर,शाहिद सय्यद, तय्यब शेख, अनिस पिंजारी, अनीस शाह,फारूक अहेलेकर, अन्वर शिकलकर,अज़ीज़ खान, समीर शेख, जावेद खान, रफीक शेख(माइक), रउफ खान, इकरा व एंग्लो चे सहकारी आदींनी प्रयत्न केले.