Home महाराष्ट्र शिवजयंती निमित्ताने डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या...

शिवजयंती निमित्ताने डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा-टॅक्सी-टेम्पो-ट्रक-ओला व उबेर चालकांसाठी सलग १५ दिवस मोफत चष्मा वाटप उपक्रमास सुरुवात

265

सलग १५ दिवसांत एकूण १० हजार मोफत चष्मा वाटपाचे लक्ष्य;पालकमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतुन अनोख्या उपक्रमाला सुरुवात

ठाण्याचे प्रथम नागरिक महापौर नरेशजी मस्के व उपमहापौर सौ पल्लवी(ताई) कदम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन

ठाणे ( प्रतिनिधी ) दि.१८ :- शिवजयंती निमित्ताने डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा-टॅक्सी-टेम्पो-ट्रक-ओला व उबेर चालकांसाठी सलग १५ दिवस मोफत चष्मा वाटप उपक्रमाचे उदघाटन ठाण्याचे प्रथम नागरिक महापौर नरेशजी मस्के व उपमहापौर सौ पल्लवी(ताई) कदम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

येणाऱ्या सलग १५ दिवसांत एकूण १० हजार मोफत चष्मा वाटपाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून पालकमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतुन अनोख्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच ठाण्याचे खासदार श्री राजन विचारे, आमदार श्री प्रताप सरनाईक, आमदार श्री रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला ठाणे शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, नगरसेवक श्री राम रेपाळे , नगरसेवक श्री रमाकांत पाटील, नगरसेवक शरद कणसे, नगरसेवक पवन कदम, श्री विनायक सुर्वे ( मामा ), वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे श्री विजय यादव, तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे, कक्षाचे ठाणे शहर जिल्हा समन्वयक श्री निखिल बुडजडे आदिजण उपस्थित होते.

यावेळी शिबीरासाठी सहकार्य देणारे डॉ श्री गणेशजी जाधव, श्री सचिनजी थोरात, श्री ज्ञानेश कानडे आणि इतर मान्यवरांना महापौर श्री नरेश म्हस्के यांच्या हस्ते विशेष सन्मानचिन्ह , शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

या शिबिरात रिक्षा-टॅक्सी-टेम्पो-ट्रक-ओला-उबेर चालकांनी फक्त आपले लायसन्स दाखविने गरजेचे आहे. लायसन्स दाखविल्यानंतर तात्काळ मोफत डोळे तपासणी आणि आवश्यकता असल्यास लगेचच मोफत चष्मा देखील देण्यात येणार आहे. हे सर्व चष्मा अतिशय चांगल्या दर्जाचे असणार असून ,गरजू वाहन चालकांना जवळचे आणि लांबचे दिसण्यासाठी बायफोकल चष्मा वितरित करण्यात येणार आहेत.

ठाणे शहरातील खालील ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी याचा लाभ सर्व वाहन चालकांनी घ्यावा असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बुधवार दि.१७ मार्च ते बुधवार दि.३१ मार्च २०२१ पर्यंत दररोज – सकाळी ११ ते सायं.५ वा. पर्यन्त हे शिबिर असणार आहे.

शिबीर स्थळ

ठिकाण क्र.०१-स्व. गंगुबाई संभाजी शिंदे सभागृह, कोरम मॉल शेजारी, रामचंद्र नगर, ठाणे(पश्चिम)

ठिकाण क्र.०२-दत्त मंदिर, वागळे इस्टेट, लॉरी असोसिएशन, चेकनाका, वागळे इस्टेट, ठाणे(पश्चिम)

ठिकाण क्र.०३- ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, जकात नाका शेजारी, कोपरी, ठाणे(पूर्व)

ठिकाण क्र.०४- ठाणे रेल्वे स्टेशन, ठाणे (पश्चिम)