Home मुंबई सम्राट महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला

सम्राट महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला

172

प्रतिनिधी – रवि गवळी

दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे तसेच मालाड पश्चिम येथे दि. १७/०३/२०२१ रोजी आंबेडकर चौक बुध्द विहार अंबोजवाडी मालवणी मालाड पश्चिम मुंबई येथे सम्राट महिला मंडळाच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) मालाड विधानसभा अध्यक्ष, सुनिल गमरे, तालुका सरचिटणीस कैलास आखाडे, तालुका संघटक शंकर वाकळे,सुमन कडलक, सोनल फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ.सोनल मुखीया, वार्ड क्र ४९ च्या अध्यक्षा लता उघडे, श्रीधर मोरे , विकास वाघमारे, सतीश साबळे, आलम भाई, संतोष डांबेधर, आचित उघडे, सुनिल आखाडे,तेजराव गवई,अंबादास अंभोरे,संजय मोरे,दशरथ कांबळे,हे उपस्थित होते.  सुनिल गमरे यांनी सांगितले की महिलांनी चूल आणि मूल संभाळण्या पुरतेच मर्यादित न राहता महापुरुषयांचे आदर्श विचारात घेऊन शैक्षणिक, शासकीय, राजकीय क्षेत्रात उतरून शासन कर्त्या जमातीचे सुत्र हाती घ्यावे व प्रियंका उघडे यांनी लहान मुलांचा नर्त्य प्रदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता त्यांचा व मुलांचा सत्कार करून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक सदिच्छा त्यांनी दिल्या.