प्रतिनिधी – बलवंत मनवर
यवतमाळ / पुसद :- पुसद कृ. उ. बाजार समीतीच्या यार्डमध्ये अनेक वर्षापासुन व्यापा-यानी विकत घेतलेल्या मालाच्या थप्यावर थप्या यार्डमध्येच असुन शेतकऱ्याना स्वतःचा माल रोडवर टाकावा लागत आहे . याकडे कृ. उ. बा. समितिच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचे वंचक राहीलेले दिसुन येत नाही.
या बाबत सहाय्यक निबंधक यांना विचारणा केली असता यार्डमधील व्यापाऱ्यानी विकत घेतलेल्या मालाच्या थप्यावर थप्या असलेल्या पोत्याच्या थप्या का उचलत नाहीत अशी विचारणा केली असता ते काम आमचे नाही असे सागीतले ते काम सचिवाचे आहे,मगर यांना सांगा आसे उत्तर दिले या विषयी कृ. उ. बा. समितिचे सचिव तथा कर्मचारी यांना दुरध्वनी वरून संपर्क साधला असता मी बाहेरगावी अहो असे सागीतले, आणी आज दि. 18/3/2021 रोजी प्रत्यक्ष भेट झाली असता कृ. उ. बा. समीतीच्या यार्डची चौकशी केली असता सहाय्यक निबंधक सुनिल भालेराव व सचिव मगर यांनी स्वतःहा पाहाणी केली असता यार्डमध्ये शेतकऱ्याच्या माला ऐवजी व्यापाऱ्यांच्या मालाच्या थप्यावर – थप्या आढळुन आल्यात आहेत , कृ.उ. बा. समीतीचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर प्रभारी सचिव कसा ,,? सचिव मगर यांना नागपुर हायकोर्टनी केस,नंबर 2206/2018 रोजी पदमुक्त केल्यानंतर त्याच खुर्चीचा मालक कसा …..? कृ. उ. बाजार समीतीमध्ये होत असलेल्या भ्रष्ट्राचाराची सखोल चौकशी करणे काळाची गरज आहे, यार्डमधील असलेला माल या आठवड्यात उचलण्यास भाग पाडेल असे त्यानी सांगीतले महत्वाची बाब म्हणजेच भाजी मंडीमधुन प्रत्येकी शेतकऱ्याकडुन 20 रूपये दलालाच्या माध्यमातुन रोजच हर्राशी झाल्याबरोबरच घेतल्या जाताता पंरतु पावती दिल्या जात नाही,”मामा का माल डबेमें”फिर आया गब्बर अशी गत पुसद येथील कृ.उ. बाजार समीतीची सुरू आहे.
शेतकऱ्यांना कृ.उ.बा. समीतीत कोणत्याही प्रकारची सुख सुविधा नसुन उन्हातान्हात शेतकऱ्यांना आनलेला माल रोडवरच टाकावा लागतो त्या यार्डमध्ये पाय ठेवण्यापुरती जागा सुद्धा शिल्लक राहीलेली नाही संपुर्ण यार्डमध्ये व्यापाऱ्याचाच मालाने भरलेला आहे व तसेच शासणाचे नियम धाब्यावर ठेऊन पायमली केल्या जात आहे,शासणाच्या नियमा प्रमाणे 11 वाजताची हर्रासी 3 वाजता केल्या जाते या यार्ड मधील असलेल्या थप्या 5 दिवसाच्या आंत न उचल्यास लोकशाही मार्गाने अन्नत्याग आंदोलन करण्यात येईलं असा इशारा सामाजीक कार्यकर्तें बळवंत मनवर (शेतकरी) यांनी उपविभागीय आधिकारी यांना लेखी निवेदनातुन म्हटले आहे .