राजेश एन भांगे
नांदेड जिल्ह्यात दिवसें दिवस कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढतच चालाला असून याच पार्श्वभमीवर जिल्हादंडाधिकारी श्री विपिन इटनकर यांनी १९ मार्च २०२१ पासून जिल्ह्यात सायं.५ ते सकाळी ७ वा पर्यंत कड्क संचार बंदी, लॉकडाऊन जारी केले आहे.
आज रोजी त्याच संदर्भात नायगांव येथे जिल्हाधिकारी डॉ.श्री.विपिन विटणकर यांनी धावती भेट देऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना पथकाची पाहणी केली.
यावेळी या korona पथकात उपविभागीय अधिकारी श्री.जमदाडे तसेच नायगाव चे तहसीलदार श्री गजानन शिंदे व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्रीनंदकिशोर भोसीकर,
कार्यालयीन अधिक्षक संतराम जाधव, श्री रामेश्वर बापूले, श्रीधर कोलमवार, गणेश चव्हाण, जाधव, साबळे, भालेराव आणि तलाठी राठोड व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
तरी या यावेळी नियमाची पायमल्ली करीत विना मास्क मुक्त संचार करीत बेजबाबदार पणे वागत korona प्रादुर्भाव पसरविण्यास कारणीभूत असलेल्या नागरिकांवर दंडापोटी १४ हजार ९०० रुपये कडून वसूल करण्यात आले आहे.
नगर पंचायती मार्फतआज सकाळ पासूनच दिवसभर अलाऊंस्मेंट करण्यात येत होते की
माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाने जिल्ह्यात सायंकाळी ५ वा. नंतर संचार बंदी लागू करण्यात आहे तरी सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य करीत आपापली दुकाने वेळेवर बंद करावी.
तरी या प्रसंगी नियांचे पालन न करणाऱ्या दोन दुकानांना दंड लावून रुपये १५००० वसूल करण्यात आले, त्यात सुगावकर हार्डवेअर ला ५००० तर प्रथवी कलेक्शन ला १०००० असे रोख दंड आकारण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर, पीएसआय कांबळे, नफा कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव, कोलमवार, कुंभार व आदी नायगांव नगरपंचायत चे कर्मचारी हजर होते.
पहिल्याच दिवशी झालेल्या या ( मोठ्या ) दंडात्मक कारवाही बद्दल व्यापारी वर्गातून मात्र नाराजी चे सुर उमटलेले दिसून आले.