मुंबई , (प्रतिनिधी) :- आरे कॉलोनी परिसरातील रॉयल पाम या उच्चभु परिसरात अनेक सोयीसुविधांचा अभाव असून नुकतेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या पाठपुराव्यामुळे कित्येक वर्षे थांबलेले थर्मा प्लास्टिगचे काम पूर्ण झाले.*
रॉयल पाम येथे अजूनही बऱ्याच सोइ सुविधांचा अभाव असून उंच टेकडीवर असलेली ही उच्चभ्रू वस्तीत बऱ्याच मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यास रिपाई डेमोक्रॅटिक कटिबद्ध असल्याचे पक्ष कार्यकर्त्यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले थर्मा प्लास्टीगचे काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या पाठपुराव्यामुळे नुकतेच पूर्ण झाले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर व राज्य महासचिव कॅप्टन श्रावण गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व अगरबत्ती प्रजवलीत करून कामाचा शुभारंभ केला.
यामुळे स्थानिकांत नव चैतन्य दिसून आले.
पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सर्व सामान्यांसह सर्व वर्गांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देऊन प्रश्न मार्गी काढण्यात येत आहेत. त्यामुळे उमदा नेतृत्व म्हणून त्यांच्या नावाला सर्व स्तरातून पसंती मिळत आहे