महिलांचे आरोग्यविषयक हक्क,अधिकार,समता या अभ्यासक्रमाच्या राज्यातील निवडक सामाजिक परिवर्तनाच्या भूमिकेतून लेखन करणाऱ्या कार्यरत माध्यमकर्मी पत्रकारांचे पाहिले अभ्यासक्रम सत्र मुंबईतील यशवंतराव प्रतिष्टान ला झाले,आता दि १५ ते १८ दरम्यान मुरुड (दापोली)जि.रत्नागिरी येथे दुसरे अभ्यास सत्र झाले,यात सहभागी पत्रकारांना हे अभ्यासक्रम सत्र पूर्ण केल्याबद्दल माध्यमकर्मीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
या अभ्यासक्रमात दोन्ही सत्रात उत्तम सहभाग व अभ्यासक्रम सत्रात यशस्वीपणे कार्यरत पत्रकार,कार्यरत माध्यमकर्मी राम खुर्दळ (“नाशिक ग्रामीण)यांना जेष्ठ वरिष्ठ पत्रकार,लेखक व राज्य संपादक (दिव्य मराठी) मा संजय आवटे यांचे हस्ते हे विशेष प्रमाणपत्र देऊन गौरवीत करण्यात आले,यावेळी जेष्ठ संपादक संजय आवटे यांनी “या-दुर्गमित्र”असा वारंवार उल्लेख केला.
खरं तर यावेळी ग्रामीण पत्रकारितेत आयुष्याची ३२ वर्षे मी करीत असलेले लेखन,थेट सामाजिक जागृती,सामान्यांच्या विवंचने विरोधार संघर्ष,व पत्रकारितेतील प्रतिकूलतेला भिडून सुरू असलेली धडपड, यावर सविस्तरपणे संवाद केला.सोबत छत्रपती शिवप्रभूंच्या दुर्गांचे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे दुर्गसंवर्धन कार्य,जागृती,किल्ले वाचवा आंदोलने याबाबत ही सरांना माहिती दिली,त्यांनी याबद्दल नेहमीच मी सोबत आहे,नक्की संपर्कात राहू असा शब्द दिला,
सन्मान,प्रमाणपत्र,पुरस्कार भरपूर मिळाले मात्र निष्ठतेच्या,त्यागाच्या,कार्याचे सन्मान खरे असतात,त्यामुळं ते सन्मान नसून ते कार्यासाठी अधिक उद्युक्त करीत असतात,हे सन्मान माझे नसून त्या सोबतील राबलेल्या प्रत्येक हाताचे आहेत…
मी काय निमित्त मात्र…
यावेळी,सम्यक-संवाद व संसाधन केंद्राचे कार्यकारी संचालक आनंद पवार,डॉ निवास वरपे यासह सर्व संयोजक व राज्यभरातील निवडक माध्यम कर्मी उपस्थित होते.
आपला-
राम खुर्दळ
(माध्यमकर्मी,aktivisht)
राज्यउपाध्यक्ष-पत्रकार संरक्षण समिती-महाराष्ट्र
मो-9423055801