जालना अंबड रस्त्यावर जागतिक जलदिनानिमित्त पानपोईचे उदघाटन
अंबड /प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भारतभुमी सुजलाम सुफलाम करतांना पशुपक्षासह किटक,जलचर तसेच वाटसरु,पाथंस्थ,यात्रेकरु यांचेसाठी निर्जंनस्थळी बारवा व पाणपोया बांधुन जनकल्याणाचे काम केले आज त्यांना जावुन 300 वर्षे लोटली तरीही त्यांनी निर्माण केलेल्या वास्तुंचा आजही वापर होतो तर त्यांनी घालुन दिलेला पाणपोईचा आदर्श नेहमीच अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी पाणपोई उदघाटन प्रसंगी केले.
जागतिक जलदिनानिमित्त मराठा टीव्ही च्या वतीने दि.22 रोजी सकाळी 11 वा जालना अंबड रस्त्यावर जोशी हाँटेलसमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणपोई सुरु करण्यात आली असुन उदघाटन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर मोहरीर तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक केदार कुलकर्णी, गंगाधर वराडे,अशोक लांडे,उपनगराध्यक्ष जाकेर डावरगावकर, मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर,बाजार समिती सचिव बाबा सोळंके, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष द्वारकादास जाधव, माजी अध्यक्ष ओमप्रकाश उबाळे,युवासेना नेते विनायक चोथे,अँड,सतिष भावले,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी चंद्रकांत दिलपाक,सरपंच परमेश्वर लेभें,लक्ष्मण गाडेकर,सागर शिंदे,नाजिम सय्यद,रुपेश जोशी सह रामभाऊ बेवले उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही सत्कार न करता केवळ फित कापून पाणपोई उदघाटन करण्यात आले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संयोजक रामभाऊ लांडे यांनी केले तर आभार अथर काजी यांनी मानले