Home विदर्भ पोलिसांनी राबविली ‘वॉश आऊट’ मोहीम…!

पोलिसांनी राबविली ‘वॉश आऊट’ मोहीम…!

165

ईकबाल शेख

२ लाख ४० हजार रुपयांचा मोहा सडवा नष्ट , ठाणेदार यांनि प्रत्यक्ष हजेरीत राबविलि वाश आउट मोहिम.

वर्धा , दि.22 – तळेगाव (शा. पंत) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भारसवाडा शिवारातील नदिच्या काठावर गावठी दारूची निर्मिती करून त्याची परिसरातील गावांमध्ये विक्री केली जात असल्याची माहिती प्राप्त होताच तळेगाव पो स्टेचे ठाणेदार आशिष गजभिये यांनी आपल्या कर्मचारी सह सदर ठिकाणी आज वाश आउट मोहिम राबवली.

या कारवाईत मोहा सडव्या सह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मोहा सडवा नष्ट करन्यात आला.

जिल्ह्यात दारूबंदी असताना भारसवाडा शिवारात गावठी दारूची निर्मितीकरून त्याची विक्री परिसरातील गावांमध्ये केली जात असल्याने त्याचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागत असे. दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजाणीसह ईतर समस्या लक्षात घेता ठाणेदार आशिष गजभिये यांनी प्रत्यक्ष हजेरीत भारसवाडा शिवारात गोदावरी नदिच्या काठि पिप्या मध्ये दाबुन ठेवलेल्या मोहा सडव्याचे १६० पिपे नष्ट केले.