यवतमाळ – बोरी अरब ग्राम पंचायत 2021-22 साठी आराखडा तयार करण्यात आला असून नवनिर्वाचित सदस्य आलेले 15 पैकी कोणालाच खबर नसल्याचा दावा सदस्य करीत आहे.
सरपंच आणि उपसरपंच यांनीच आराखडा तयार केला आणि पंचायत समिती कडे अहवाल पाठविला असून कोणत्याच सदस्य ला कानोकान खबर नाही.
जनतेला ला कोणत्या वॉर्डात मिळणार या कृती आराखडयातुन सुविधा किंवा राहणार वंचित हे कोणालाच कल्पना नाही.
सदस्य हा फक्त नावा पुरता आणि काना खालचा असा स्पष्ट दिसून येत आहे. अनेक सदस्य ला कृती आराखडा कश्याला म्हणतात हे देखील माहिती नाही…
कोणतीही मीटिंग न घेता कृती आराखडा तयार करणे हा दुर्दैवीबाब
गेल्या 24 तारखेपासून ग्राम सेवक गायब होते आणि त्यांची अचानक पने बदली झाली
त्या नंतर नवीन ग्रामसेवक रुजू झाले अशी फक्त चर्चा असून नेमके ग्रामसेवक आहे तरी कोणते याची कल्पना कोणालाच नाही. जेव्हा ग्रामसेवकच नाही तर कृती आराखडा कसा झाला तयार. अश्या अनेक बाबी असून ग्राम पंचायत वर नेमुंन दिलेला प्रशासकीय विना अधुरी आहे ग्राम पंचायत…