ईकबाल शेख
वर्धा – दि. २१.०३.२०२१ रोजी फिर्यादी हे आपले दुचाकीने नागपूरवरून येत असताना त्यांना दुपारी अंदाजे १६.३० ते १६.४५ दरम्यान भोवळ आल्याने गाडी थांबवून रोडचे बाजूला बसले असता तिथे हिरो होंडा मोटारसायकल व मोपेड या दुचाकी वाहनाने २०-२५ वर्ष वयोगटाच्या चार अनोळखी ईसम आले त्यांनी फिर्यादी यांना “तेरे जेब में क्या है दे दे “असे म्हणून फिर्यादीला लाथा बुक्यानी मारून फिर्यादीच्या खिशातील पॉकेट ज्यात २५००/- रु व ATM कार्ड तसेच ईतर कागदपत्रे होते व एक विवो कंपनीचा मोबाईल ८०००/- रु. असा एकूण १०,५००/- रु चा माल जबरीने हिसकावून नेला. फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. सेवाग्राम येथे अप.क्र. १३९ कलम ३९४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून मा. पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी/पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन करून दिलेल्या निर्देशांप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी सांगितले. त्या अनुषंगाने एक पथक तयार करून गुन्ह्यातील वर्णनाचे आरोपींचा शोध सुरु करण्यात आला. त्यानुसार मिळालेल्या मुखबीरच्या गोपनीय माहितीवरून १) विक्रमसिंग सबजीतसिंग टाक, वय १९ वर्ष, २) अजय मुरलीधर ठाकरे, वय ३० वर्ष, दोन्ही, रा सिख बेडा सावंगी मेघे, ३) आकाश वामन साटोणे वय ३१ वर्ष, रा. पोटदुखे ले-आऊट, सावंगी मेघे, ४) सौरभ अनिल वनकर, वय २४ वर्ष, रा. होमगार्ड ऑफिस जवळ, वर्धा यांना ताब्यात घेऊन कस्सून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केल्याने आरोपीतांना अटक करून त्यांचेकडून १) ओप्पो मोबाईल कि ८०००/- रु, २) गुन्ह्यात वापरलेली मो. सा.क्र. एमएच-३२/के-११२ कि २०,०००/- रु, ३) मोपेड बजाज वेव्ह क्र. एमएच-३२/के-३५४ कि २०,०००/- रु. असा एकूण ४८,०००/- रु चा माल जप्त करून व गुन्हा उघडकीस आणला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत साळुंखे, पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे यांचे मार्गदर्शनात सपोनि. श्री महेंद्र इंगळे तसेच पोलीस अंमलदार स्वप्नील भारद्वाज, संघसेन कांबळे, विकास अवचट, रितेश शर्मा, राकेश आष्टणकर यांनी केली.