Home नांदेड मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने कॉंग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांच्या उपोषणाची सांगता !

मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने कॉंग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांच्या उपोषणाची सांगता !

762

मजहर शेख, नांदेड

नांदेड/माहूर,दि : २३:- माहूर-माहूर शहरातील नागरिकांच्या विविध मागण्याची तातडीने पूर्तता करण्याच्या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी दि.२२ मार्च २०२१ पासून नगर पंचायत कार्यालय माहूर समोर आमरण उपोषण सुरु केले होते.

त्यांच्या मागण्यामध्ये माहूर शहराला किमान चार दिवसाआड शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करा व सन २०१३ मध्ये मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण करा. पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान मिळविण्यासाठी तत्काळ पाठपुरावा करून लाभधारकांना अनुदान वाटप करा. कोरोना महामारीच्या काळातील पाणी पट्टी १०० टक्के माफ करा आदी मागण्याचा समावेश होता. तिन्ही मागण्या नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने उपोषणास वाढता पाठिंबा मिळत असल्याचे पाहून तसेच दि.२४ च्या मध्यरात्रीपासून कोरोना लॉकडाऊन होणार असल्याच्या अनुशंगाने जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार माहूर न.प. च्या उपाध्यक्ष सौ.अश्विनीताई आनंद पाटील तुपदाळे, मुख्याधिकारी विद्या कदम व कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी, पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी उपोषण स्थळी उपोषणकर्ते आनंद पाटील तुपदाळे यांचेशी मागण्याबाबत चर्चा करून मागण्या सोडविण्यासाठी नगरपंचायत प्रशासन प्रयत्नशील असून शक्य तितक्या लवकर तातडीने मागण्याची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन देऊन कोरोना प्रसाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षत घेऊन उपोषण थांबविण्याची विनंती केली असता नगरपंचायत प्रशासनाने लेखी पत्र दिल्याने दि.२३ मार्च २०२१ रोजी उपोषण थांबविले.