जालना – लक्ष्मण बिलोरे
मराठवाडयात गेल्या चार दिवसांत झालेल्या वादळी वार्याच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची सर्व रब्बी पिके पुर्णपणे जमीनदोस्त झाली असुन खरीप पिकांबरोबर रब्बी पिके सुद्धा हातातुन गेलेली आहेत. अशा परिस्थितीत सरकारने तातडीने पंचनामे करुन सरसकट पिक विमा मंजूर करण्या संदर्भात हालचाल कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे.
या अवकाळी पावसामुळे ऐन काढणीला आलेला गहु,हरभरा,कांदा तसेच बाजरी व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन या गारपीटीच्या पावसामुळे पुर्ण पीके मातीमोल झालेली आहेत.या अस्माणी संकटामुळे शेतकरी राजा पुर्णपणे हवालदिल झाला आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा देणे गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देऊन तुर्त दिलासा द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरीष भोसले यांनी केली आहे.
गेल्या खरीप हंगामात सुद्धा अशाच प्रकारचा मुसळधार पाऊस पडुन पीके उद्ध्वस्त झालेली आहेत.आणि आतासुद्धा या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांची होळी झाली आहे.
अशा संकटग्रस्त काळात शासनाने हस्तक्षेप करुन पिक विमा कंपनीला विमा देण्यासाठी भाग पाडावे व शेतकर्यांची आर्थिक घडी सुरळीत करावी.
यंदाच्या खरीप हंगामात चांगला पाऊसकाळ झाल्यामुळे रब्बी हंगामासाठी मुबलक पाणीसाठा होता त्यामुळे रब्बी पिकांची वाढ चांगली झाली होती.परंतु ऐन काढणी पश्चात झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे गहु हरभरा, कांदा ही पिके संपुर्ण पणे नष्ट झाली आहेत.
खरीपा बरोबरच रब्बी हंगाम सुद्धा निसर्गाच्या लहरीपणामुळे हिराऊन गेला आहे.उत्पादन खर्चाची सुद्धा पुर्तता न झाल्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी होऊ लागला आहे. शेतकर्यांचे पोट हे शेतीतल्या उत्पादनावर भरत असल्यामुळे आता दैनंदिन खर्चाची सुद्धा घडी विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,अशा परिस्थितीत सरकारने जर हस्तक्षेप केला नाही तर शेतकर्यांच्या आत्महत्या वाढतील त्यामुळे सरकारने या घटनेकडे गांभीर्याने पाहावे व वेळीच हस्तक्षेप करुन या संकटातुन शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरीष भोसले यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे.
यावेळी राजेंद्र डाके,आखील शेख,बंडु दाभाडे,भरत जाधव,राजेश राठोड, गणेश भावले,भैय्यासाहेब जाधव,कीरण येवले,महादेव जगताप,माऊली मते,नवनाथ बहीर,पांडुरग कोकरे,सुहास जाधव,विकास जाधव तसेच असंख्य शेतकरी उपस्थित होते.