Home नांदेड किनवटच्या एस बी आय बँकेत ग्राहकांची हेळसांड.

किनवटच्या एस बी आय बँकेत ग्राहकांची हेळसांड.

682

मजहर शेख, नांदेड

नांदेड/किनवट, दि : २४:- भारतीय स्टेट बॅक आणी स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद या दोन राष्ट्रीयकृत बॅकांचे विलिनीकरण झाले त्यावेळी या दोन्ही सर्वात जुण्या बॅकांकडे प्रचंड ग्राहकसंख्या होती त्यामुळे अनेक तालुक्यात विलिनीकरणा नंतर देखिल दोन्ही बॅकांच्या शाखा ह्या पुर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आल्या त्यामुळे ग्राहकांना होणारा त्रास कमी झाला परंतु किनवट शहर त्यास अपवाद ठरला हे दुर्दैवच म्हणावे लागेल कारण या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे येथिल तत्कालीन व विद्यमान लोकप्रतिनिधीनी सपशेल दुर्लक्ष केल्याने आज किनवट तालुक्यातील बॅकेच्या ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
कारण दोन्ही बॅकांच्या विलिनिकरणा नंतर सुमारे २ लक्ष खातेधारक एवढा प्रचंड व्याप असलेली बॅक शाखा निर्मान झाली असुन यामुळे दररोजच्या ग्राहकांना बॅकींग सेवा पुरवण्यात हि शाखा सपशेल अपयशी ठरली आहे, दोन्ही बॅकांचे मिळुन एकच कॅश कांऊटर आहे त्याव्दारेच व्यवहार केल्या जातात त्यामुळे बॅकेत नेहमी लांबलचक रांग असते हा झाला रोजच्या पैसे भरणा व उचल करण्याचा प्रश्न तर कर्ज प्रकरण, गहाणखत कर्ज प्रकरण, हाऊस लोन, व्ययक्तीक लोन, सोने तारण कर्ज, डोअर डिलिव्हरी सेवा या सर्व सेवां करिता भारतीय स्टेट बॅक मोठमोठ्या जाहिराती करते परंतु किनवट ची भारतीय स्टेट बॅकेची शाखा त्यांच्या मुख्य शाखेव्दारे घोषित योजनांची अमलबजावणी करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे.
यात जर एखाद्याने व्यवसायाकरिता कर्ज मागीतले तर समजा त्याच्या चपल्ला झिजुन जातील एवढ त्याला असहकार्य किनवट च्या भारतीय स्टेट बॅकेच्या शाखेकडुन केले जाते यात तर विद्यार्थ्यांच्या एज्युकेशन लोन व शेतक-यांच्या पिक कर्ज मागणा-यांची तर या शाखेकडुन थट्टाच केली जाते त्यामुळे याकडे या भागातील जागृत लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
भारतीय स्टेट बॅकेच्या व्यवस्थापाना कडुन दैनंदिन व्यवहाराकरिता एक व्दार उघडे ठेवण्यात येते तर कर्ज प्रकरण व बाकीच्या शासकीय कामा करिता पोस्ट ऑफिस च्या बाजुने दुसरे व्दार नेहमी बंद असते त्यामुळे ग्राहकांना बॅक कर्मचा-यांना बाहेरुन विनवण्याकरुन बॅकेत प्रवेश दिला जातो त्यात ज्याची पत मोठी त्यालाच प्रवेश दिला जातो व ग्राहकांसोबत भेदभावपुर्ण व्यवहार केला जातो यामुळे या बॅक शाखेत अनेक कर्ज प्रकरण हे रखडले असुन याचा भुर्दंड नागरीकांना उचलावा लागत आहे. विनाकारण व्याज भरावा लागत आहे. शेवटी असे प्रकरण न्यायप्रविष्ठ होत आहेत.
तरी भारतीय स्टेट बॅकेच्या किनवट शाखेने पुर्ण क्षमतेने काम करुन ग्राहकांना सर्व सोई सुविधा पुरवल्या पाहिजे जसे कि बॅक कॉउंटर ची संख्या वाढवली पाहिजे, पैसे उचल करणे, भरणे या करिता वेगवेगळे व जास्तीचे कॉऊंटर उघडले गेल पाहिज, ग्राहकांना थंड पाणी उपलब्ध करुन दिले पाहिजे, कर्मचा-यांनी सभ्यतेने ग्राहकांसोबत वागणुक केली पाहीजे अशी अपेक्षा किनवट येथिल नागरीक बाळगुन आहेत तर बॅकेकडुन जागोजागी उघडुन ठेवलेले मिनी बॅक संचालकांकडुन होत असलेली ग्राहकांची लुट थांबवली गेली पाहिजे.