घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे
जालना – जिथे मेल्यानंतर जळायचं आहे,हे माहीत असूनही जीवंतपणी यापैकीच काही लोकांनी स्मशान भुमीत चोऱ्या कराव्यात ..? मोठी शोकांतिका समजली जात आहे.
पिंपरखेड बु येथील स्मशानभूमी मोजतेय अखेरची घटका..!
अस्वच्छता, सोयीसुविधांचा अभाव; रस्त्याची दुरवस्था देखभाल दुरुस्ती साठी ग्रामपंचायतीकडे निधीच नाही ?
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील प्रतिपंढरपुर तीर्थक्षेत्र असलेल्या पिंपरखेड बु गावातील सार्वजनिक स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. स्मशानातील सभोवताली गवत व झाडे झुडपे वाढली आहेत. कोणतीच देखभाल दुरुस्ती व साफसफाई नाही,अस्वच्छता आणि परिसराला हगणदारीचे स्वरुप आले आहे.विशेष बाब म्हणजे या स्मशानभूमीच्या देखभाल दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे निधीच उपलब्ध नसल्याचे बोलले जाते.
पिंपरखेड बु गावची लोकसंख्या जवळपास ६ हजार आहे. आणि निम्म्याहून अधिक लोक दहन विधीसाठी यावरच अवलंबून आहेत. बर्याचदा दहन विधी झाल्यानंतर संबंधित लोक किंवा ग्रामपंचायत मार्फत साफसफाई देखील केली जात नाही. रात्रीच्यावेळी विजेची व्यवस्था नाही. विजेचे दिवे लावल्यावर लगेच चोरून नेले जातात,ज्या लोकांचे मुडदे येथे जळणार आहेत त्यापैकीच काही लोक जीवंत असताना स्मशनात चोरी करत आहेत...माणसाच्या गर्दीत माणुसकी हरवत चालली आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यासर्व परिस्थितीमुळे मृतदेहाची व मृतांच्या नातेवाईकांची फरफट होत आहे.
हे पण वाचा…!
अस्वच्छता, दुरवस्था, सोयीसुविधांचा अभाव आहे. स्मशानभूमीची ग्रामपंचायतीने लागलीच दुरुस्ती करावी. तसेच येथे कायमस्वरूपी माणसाची व्यवस्था करावी.
– अनिल सानप (ग्रामपंचायत सदस्य)
कोविड आणि वसुली होत नसल्याने ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नाही. परिणामी स्मशानभूमीची देखभाल दुरुस्ती करणे शक्य नाही. मात्र काही निधी उपलब्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल.
– सौ.सुनिता अशाेकराव आघाव (सरपंच, पिपंरखेड)