Home नांदेड लॉकडाउन यशस्वी करण्याचे प्रशासना समोर आव्हाण.

लॉकडाउन यशस्वी करण्याचे प्रशासना समोर आव्हाण.

373

मजहर शेख, नांदेड

नांदेड/किनवट, दि : २४:- जिल्ह्यात उद्यापासुन लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे तर यामुळे नागरीकांनी जिवनावश्यक साहित्यांची जुळवा्जुळव करण्याची धावपळ चालु आहे, परंतु जिल्हा प्रशासनाकडुन जाहीर करण्यात आलेले लॉकडाउन यशस्वी करण्याचे आव्हाण किनवट तालुक्यातील महसुल प्रशासन, पोलिस प्रशासन व नगर परिषद तथा संबधित गावातील ग्रामपंचायत प्रशासना समोर आहे.
कोरोना विषाणुच्या साखळीला तोडण्याकरिता प्रशासनाकडुन मागील एकावर्षात अनेकवेळा लॉकडाऊनचे अस्त्र वापरण्यात आले परंतु लॉकडाउन लागु करणे सोपे असुन याकाळात सर्वसामान्य नागरीकांना जगण्याचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे अशा प्रकारे वारंवार होणारे लॉकडाऊन हे गोरगरीब कष्टकरी नागरीकांकरीता हितावह नाही, त्यामुळे काहीही करा पण या लॉकडाउनचा एकदाचा निकाल लावा असे गोरगरीब कष्टकरी जनतेतुन प्रशासनाला आवाहन करण्यात येत आहे त्यामुळे लागु करण्यात आलेल्या लॉकडाउनची कडक अमलबजावणी केली गेली तर पुन्हा लॉकडाउन लावण्याची गरज भासणार नाही हे ही तितकेच खरे आहे. तर प्रशासनाला पाहिजे कि त्यांनी विनाकारण शहरात फिरणा-या नागरीकांसह विनाकारण प्रवास करणा-या नागरीकां विरुद्ध देखिल कारवाई केली पाहिजे जेणे करुन कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यास मदत होईल तर ज्यावेळेत आस्थापणांना उघड्ण्याची परवानगी देण्यात आली आहे तेवढ्याच वेळेत त्या उघड्या राहिल्या पाहिजे तर त्याठीकाणी नको ती अनावश्यक गर्दी झाली नाही पाहिजे याचीही खबरदारी घेण्यात आली पाहिजे.
अत्यावश्यक सेवांच्या रहदारीकरिता ओळख पत्र व पास देण्यात आल्या पाहिजे परंतु अजुन अशा सेवांना कोण पास पुरवणार याचा ताळमेळ लागलेला नाही त्यामुळे डोअर डिलिव्हरी देऊन सेवा देणा-यां समोर प्रश्न उपस्थित राहिला आहे. वृत्तपत्राकरिता बातम्यांचे संकलन करणा-यां प्रतिनिधींना देखिल प्रशासनाकडुन ओळख पत्र देण्यात आले पाहिजे तर अत्यावश्यक सेवां कोणत्या व त्यांच्या वेळा किती याची माहिती प्रशासनांने स्थानिक पातळीवर पुरवली पाहिजे यामुळे नको ती गर्दी टाळता येणार आहे.
एकदाचे लॉकडाऊन लागु करुन त्याची कडक अमलबजावणी केल्यास त्यातुन कोरोना विषाणुची साखळी तोडली तरच नेहमी नेहमी लॉकडाउन करण्याची आवश्यकता भासणार नाही अन्यथा या अशा अनेक लॉकडाऊनचा सामना करुन नागरीकांना बेजार व्हावे लागणार आहे. त्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट, तहसिलदार किनवट, उपविभागीय पोलिस अधिकारी किनवट, पोलिस निरिक्षक किनवट, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी किनवट, विविध गावातील ग्राम विस्तार अधिका-यांनी एकत्र नियोजन करुन लॉकडाऊन यशस्वी करावे.