Home जळगाव रावेर लोकसभा क्षेत्राची एम आय एम पदाधिकाऱ्यांची नेमणूक; जिल्हाध्यक्ष फिरोज शेख यांनी...

रावेर लोकसभा क्षेत्राची एम आय एम पदाधिकाऱ्यांची नेमणूक; जिल्हाध्यक्ष फिरोज शेख यांनी केली निवड

234

रावेर (शरीफ शेख)

एम आय एम रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष फिरोज शेख यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये काही पदाधिकाऱ्यांची फेर नेमणूक करण्यात आली. तसेच यावल शहराचे शहराध्यक्ष पदावर आबिद खान यांची फेर निवड करण्यात आली व उपाध्यक्ष पदावर वसीम शेख यांची निवड झाली. व फेर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष फिरोज शेख यांच्या सोबत भुसावळ तालुका अध्यक्ष अशरफ तडवी,जिल्हा महासचिव कलीम शेख,युवा जिल्हा अध्यक्ष नावेद खान,युवा कार्यकर्ता आवेस खान, यावल चे नवनियुक शहर अध्यक्ष आबीदखान,उपाध्यक्ष वसीम खान, एजाज मौलाना, भावी नगरसेवक आणि वसीम शेख हे उपस्थित होते.