संतोष भद्रे
नांदेड तालुक्यासह परिसरात खुले आम कलम 144 चे उल्लंघन होत आहे.बेसुमार वाळूचा उपसा होत आहे.गंगाबेट, बेटसांगवी,भनगीसह अनेक ठिकाणाहून अवैध वाळू उपसा होत आहे. लाखोंचा महसूल बुडत असून हे वाळू माफिया वाळूस्थळावर खुले आम दरोडा टाकत आहेत.त्यांना कलम 144 लागू होत नाही का..?एखाद्या गरीब मास्क न घातल्यास त्याला 200 रुपये दंड लावल्या जातो.एखाद्या गरीब शेतकरी बाजारात भाजीपाला घेऊन बसला तर त्याला उठविल्या जाते .परंतु प्रशासनाच्या डोळ्यादेखत लाखोंचा महसुल बुडत असताना कारवाई होत नाही.हे लॉकडाऊन गोरगरीबासाठीच का..?आमच्या मजुरांना हाताना काम नाही मात्र परप्रांतीय मजूर येथे येऊन वाळूमाफियासोबत प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दादागिरी दाखवत आहे..
गोरगरिबांना लॉक डाऊन..
अन वाळूमाफियाना सोडा तोंड पाहून..असेच दिसून येते तहसीलदार, नायबतहसीलदार,मंडळ अधिकारी, तलाठी यांना सर्व माहीत असूनही याचा “अर्थ” काय…? कलम 144 चे उल्लंघन कोण करतय..? नुसते तराफे जाळल्या जात आहेत याचा अर्थ खुलेआम वाळूस्थळावर दरोडा पडत आहे या वाळूचोर दरोडेखोरावर का कारवाई होत नाही.हे मात्र विशेष