Home पश्चिम महाराष्ट्र होळी पोर्णीमे निमित्त पोलीस मित्र परिवार समन्वय समिती तर्फे गरिब,निराधार विधवा महिलांना...

होळी पोर्णीमे निमित्त पोलीस मित्र परिवार समन्वय समिती तर्फे गरिब,निराधार विधवा महिलांना मदतीचा हात..!

193

पोलीस मित्र समन्वय समिती चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष-मा.श्री.डाँ.उमरेसर, महाराष्ट्र राज्य सचिव-मा.विनोद पत्रे यांच्या आदेश्याने व मा. श्री.सुभाषदादा सोळंके सर,महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष-मा.हजी अस्लम सैयद सर व पश्चिम महाराष्ट्र महिला प्रमुख माधुरीताई गुजराती यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्चिम महाराष्ट्र महिला सचिव सौ प्रतिभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि.३० मार्च होळी निमित्त व मा.सौ.माधुरी ताई गुजराती पश्चिम महाराष्ट्र महिला विभाग प्रमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लाॅकडाऊन काळात समाजतील गरिब निराधार महिला,विधवा महिला ज्यांचा जगण्याचा आधार फक्त मजुरी आहे.मजुरी शिवाय कोणताही रोजगार व आधार नसल्यामुळे बऱ्याच कुटुबियांवर व कुंटुबियात असणाऱ्या लहान-मोठ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.समाजाच ॠण म्हणुन व सामाजिक जबाबदारी समजुन समिती तर्फे गृह उपयोगी धान्य (तांदूळ साखर) देवून समाज ऋणातून थोडीशी उतराई म्हणून महिलांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र महिला सचिव सौ प्रतिभा पाटील,सांगली जिल्हा महिला अध्यक्षा सौ. सुनीता काळे उपाध्यक्षा सुनिता पाटील.उपाध्यक्षा धनश्री चौधरी सांगली जिल्हा सचिव श्री मोमीन सर,समीर मोमीन व सांगली विभागातील सर्व पोलीस मित्र परिवार समन्वय समिती चे पदधिकारी व आदी मान्यवार याप्रसंगी उपस्थित होते.या रबविण्यात आलेल्या उपक्रमाचे गरिब व निराधार महिलांनी आभार व धन्यवाद व्यक्त केले, व पोलीस मित्र परिवार संघटनेचे महिलांनी आभार व्यक्त केले व परिसरातही या कार्याचे कौतुक होत आहे.या उपक्रमा साठी सांगली विभागातील पोलीस मित्र परिवार समन्वय समिती च्या सर्व पदधिकाऱ्यांनी सहकार्य व मदत कली.